टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहराजवळील एका मंगल कार्यालयात अल्पवयीन मुलीशी साखरपुडा कार्यक्रम सुरु असताना अचानक पोलीस मंगल कार्यालयात हजर झाल्याने
एकच खळबळ उडून हा विवाह नसून हा साखर पुड्याचा कार्यक्रम होत असल्याचे मुलीच्या वडिलाने लेखी जबाब पोलीसांना लिहून दिल्याने पुढील होणारा अनर्थ टळला आहे.
या घटनेची हकीकत अशी, दि.२५ रोजी दुपारी १२.३० च्या दरम्यान मंगळवेढा शहराजवळील सप्तशृंगी मंगल कार्यालयात एक बालविवाह होत असल्याची
गोपनीय माहिती पोलीसांना मिळताच पोलीस निरीक्षक रणजीत माने यांच्या मार्गदर्शनाखाली शहर बीटचे पोलीस नाईक कृष्णा जाधव,
महिला पोलीस हवालदार सुनिता चवरे, राजू चंदनशिवे, पांडुरंग भोई आदी पोलीसांची टीम मंगल कार्यालयात पोहचल्यानंतर त्यांनी याबाबत चौकशी केली असता
मोहोळ तालुक्यातील १७ वर्षीय मुलगी व बोराळे येथील मुलगा आदी मंगल कार्यालयात दिसून आले. मुलीच्या वडीलाने आम्ही साखर पुड्याचा कार्यक्रम करण्याकरिता आलो आहोत,
आमचा साखरपुडा चालू असून मुलीचे वय १८ वर्षे पुर्ण झाल्यानंतर तिचा विवाह करणार असून आजरोजी केवळ साखरपुडा करणार असल्याचे दिलेल्या जबाबात म्हटले आहे.
पोलीसांनी मुलीच्या वयाची पडताळणी करण्यासाठी पुरावा मागीतल्यावर त्यांनी तो सादर केला. दरम्यान हा प्रकार गैरसमजूतीमधून कोणीतरी चुकीची माहिती दिल्याने घडला असल्याचे दिलेल्या जबाबात नमूद करण्यात आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज