
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील मरवडे येथील दोन मटका अड्डयांवर मंगळवेढा पोलिसांनी अचानक छापा मारून 15 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून या प्रकरणी तीघांविरूध्द मंगळवेढा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,मरवडे येथे मटका सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर मंगळवेढयाचे पोलिस निरिक्षक जोतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक बापूसाहेब पवार,गजानन पाटील,सचिन बनकर आदींचे पोलिस पथक 27 मे रोजी मरवडेत दाखल झाले. त्यावेळेस सकाळी 11.30 वा. अशोक रामचंद्र पडवळे (वय 50 रा.मरवडे ) हा सिध्दू सलगर (रा.शरदनगर) याच्या सांगण्यावरून मरवडे गावातील एस.टी.स्टँडच्या पाठीमागील रोडवर शाळेसमोर रोडवरून येणार्या जाणार्या लोकांकडून आकडेमोड करून कल्याण नावाचा मटका घेताना त्यास पकडले.व त्याचेकडून रोख रक्कम 230 व मटक्याचे साहित्य जप्त केले.
तसेच दुपारी 12.00 वा.आनंदा सुभाष घुले(वय 44 रा.मरवडे) हा सिध्दू सलगर (रा.शरद नगर)याच्या सांगण्यावरून मरवडे गावात डोणज रोडवरून येणार्या जाणार्या लोकांकडून आकडेमोड करून कल्याण नावाचा मटका घेत असताना त्याला पोलिसांनी रंगेहाथ पकडले.व त्याचेकडून रोख रक्कम,बजाज डिस्कव्हर दुचाकी व मटक्याचे साहित्य असा एकूण 15 हजार 270 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी अशोक पडवळे,आनंदा घुले व सिध्दू सलगर या तिघांविरूध्द मंगळवेढा पोलिसांत महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार विनोद घोळसगावकर हे करीत आहेत.
Police raids on Matka bases; Bookie owner Sidhu Salgar filed a case against both of them
————————–
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













