मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मंगळवेढा तालुक्यातील मल्लेवाडी येथील मारुती मंदिराच्या बाजूस आडोशाला गोलाकार बसून 52 पानाच्या पत्यावर मन्ना नावाचा जुगार खेळणार्या ठिकाणी पोलीसांनी छापा मारुन 97 हजार 620 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन
कुमार ज्ञानेश्वर रायबाण (वय 52), संभाजी विठ्ठल गोडसे (वय 49), राहुल विलास मस्के (वय 40), सर्जेराव गुलाब मस्के (वय 60 सर्व रा.मल्लेवाडी) या चौघाविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेची हकीकत अशी, मल्लेवाडी येथील मारुती मंदिराच्या बाजूला आडोशाला गोलाकार बसून मन्ना नावाचा जुगार काही इसम खेळत असल्याचे गोपनीय माहिती प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकारी नयोमी साटम यांना मिळताच
त्यांनी पोलीसांच्या मदतीने छापा टाकला असता वरील चौघे आरोपी गोलाकार बसून जुगार खेळत असल्याचे निदर्शनास आले.
सदर ठिकाणाहून हिरो होंडा मोटर सायकल, रोख रक्कम, मोबाईल असा एकूण 97 हजार 620 रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज