टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील माचणूर येथील अंबाबाई देवीचे मंदिरासमोरील मोकळया जागेत गोलाकार बसून 52 पानाच्या पत्त्यावर पैशाची पैज लावून मन्ना नावाचा
जुगार खेळणार्या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकून 2 लाख 60 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून 11 जणांविरूध्द मुंबई जुगार कायदा कलम 12(अ)प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,दि.18 रोजी 5.10 च्या सुमारास माचणूर येथील अंबाबाई देवीचे मंदिरासमोरील मोकळया जागेत यातील आरोपी विष्णू एकनाथ शिवशरण (वय 50), गणपती पांडुरंग डोके (वय 73), नानासाो पांडुरंग डोके (वय 60), वसंत सावळा कलुबर्मे (वय 70), गणेश दत्तात्रय सरवळे (वय 30),
सुरेश गजेंद्र पाटील (वय 60), दिलीप ज्ञानेश्वर शिवशरण (वय 55), सुरेश राजू सरवळे(वय 60), गुंडाराज अंजन कांबळे (वय 35), लक्ष्मण नागनाथ डोके (वय 50), नितीन रविंद्र वाघमारे (वय 40) आदी 11 जण गोलाकार बसून 52 पत्त्याच्या पानावर पैशाची पैज लावून मन्ना नावाचा जुगार खेळत असताना पोलिसांना मिळून आले.
यावेळी पोलिसांनी रोख रक्कम 10 हजार 80,50 हजार रुपये किमतीची हिरो कंपनीची स्प्लेंडर मोटर सायकल(एम एच 13,डी.एन.9860),दुसरी 50 हजार रुपये किमतीची हिरो कंपनीची एम एच 13 ए आर 1403,तिसरी 50 हजार रुपये किमतीची एम एच 13,यु.3923 स्प्लेंडर मोटर सायकल,
चौथी 50 हजार रुपये किमतीची एमएच 13,बी.टी.1395 स्प्लेंडर मोटर सायकल,पाचवी 50 हजार रुपये किमतीची एम एच 13 डी.डी.2739 बजाज प्लॅटिना अशा एकूण 2 लाख 60 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दरम्यान याची फिर्याद वाहनचालक पोलिस अंमलदार महेश माने यांनी दिली असून याचा अधिक तपास बोराळे बीटचे पोलिस हवालदार खंडागळे हे करीत आहेत.
मंगळवेढा पाेलीसांनी जूगार,मटका,आवैध प्रवासी वाहातुक,बेकायदा दारू विक्री, आदि आवैध्य व्यवसायावर कारवाईची माेहीम हाती घेतली आसुन या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज