मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
वडूज (जि. सातारा) येथील पोलिस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या शिवाजी मारुती विभुते (रा.बोंबेवाडी, ता. आटपाडी) याने शनिवारी रात्री आटपाडी ते पिंपरी रस्त्यावर मंदधुंद अवस्थेत बेफान चारचाकी चालवून सात ठिकाणी धडक दिली. यामध्ये एकाचा मृत्यू तर पाचजण जखमी झालेत. मयतचा भाऊ अण्णासो पुजारी यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजीराव विभूते हे मंगळवेढा पोलीस ठाण्यात कार्यरत असताना त्यांनी भर चौकात एका मुलाच्या डोक्यावर पाय दिला होता त्यावेळी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती.
दरम्यान आरोपीला अद्याप अटक केली नसल्यामुळे आंबेवाडी ग्रामस्थांनी मयताचे प्रेत आंबेवाडी गावात नेहून तेथून सहाय्यक पोलीस निरीक्षक विभूतीच्या गावी बोंबेवाडी ला अंत्यविधीसाठी सायंकाळी नेले होते यामुळे तणावाचे वातावरण बनले आहे.
बाजारासाठी बिराजी पुजारी रा.आंबेवाडी आले होते. ते टेलरिंगचा व्यवसाय करतात. बाजार करून रात्री आठ वाजता आटपाडी ते पिंपरीकडे जाणाऱ्या रस्त्यावरून गावाकडे मोटरसायकलवरून निघाले होते.
याच दरम्यान समोरून आटपाडीकडे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी विभुते स्विफ्ट डिझायर कंपनीची चार चाकी गाडी घेऊन आटपाडीकडे प्रचंड आणि बेफान वेगाने येत होती. ते मंद धुंद अवस्थेत होते. गाडीवर नियंत्रण नव्हते. त्यांची समोरून येणारी गाडी पाहून प्रत्येक जण रस्ता सोडून बाहेर जात होता. येता-येता दोन ठिकाणी गाडीने धडक दिली. देशमुखवाडी जवळ बिराजी पुजारी यांच्या मोटरसायकलीला धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले.
यावेळी ग्रामस्थांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला तरीही ते थांबले नाही. उलट आणखी वेगाने आटपाडीकडे निघून गेले. जाता जाता पाच ते सात ठिकाणी धडक दिली.यामध्ये पाच जखमी झालेत. बिराजी पुजारी यांना उपचारासाठी तातडीने आटपाडीत खाजगी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.या घटनेमुळे आंबेवाडी ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यासमोर रात्री साडेनऊ वाजता प्रचंड मोठी गर्दी केली. सकाळी मयताचे शवविच्छेदन केले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज