टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित माने यांची मंदिर सुरक्षा पंढरपूर येथे बदली करण्यात आली आहे.
पंढरपूर येथील मंदिर समितीचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण हे मंगळवेढा पोलीस स्टेशनचे नवे पोलीस निरीक्षक असणार आहेत.
पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी गाडी चोरणाऱ्या तसेच घरफोडी टोळीचा पर्दाफाश केला होता. खून, दरोड्यासह अनेक गुन्हे उघडकीस आणले होते.
सर्कलकडे आढळली बेहिशेबी मालमत्ता; पती-पत्नीविरुद्ध गुन्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
मंडल अधिकाऱ्याकडे बेहिशेबी मालमत्ता असल्याचे पडताळणीत आढळल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाकडून सापळा लावून कारवाई केली.
या प्रकरणी सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे. संजय बाबूराव फिरमे (मंडल अधिकारी, वय ५४) व त्यांची पत्नी संध्या संजय फिरमे (वय ५२, फाटा श्रीनाथनगर, माळशिरस) अशी गुन्हा नोंदलेल्या दोघांची नावे आहेत.
मंडळ अधिकारी संजय फिरमे यांनी संपादित केलेल्या मालमत्तेबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर कार्यालयाकडून उघड चौकशी केली होती.
त्यांनी संपादित केलेली मालमत्ता कायदेशीर स्त्रोताद्वारे संपादित केली किंवा कसे याबाबत त्यांना वेळोवेळी संधी देऊन माहिती घेण्यात आली होती; परंतु त्यांनी संपादित केलेल्या मालमत्तेबाबत पुष्टीदायक पुरावे सादर करू शकले नाहीत.
त्यांनी ६ एप्रिल १९९८ ते ३० सप्टेंबर २०१७ या लोकसेवक पदाच्या काळात कायदेशीर उत्पन्नापेक्षा अधिक किमतीची मालमत्ता स्वतःच्या पत्नीच्या नावे संपादित केल्याचे चौकशीत उघड झाले आहे.
त्यांनी संपादित केलेली १७ लाख ६३ हजार ७६७ रुपयांची बेहिशेबी मालमत्ता त्यांच्या उत्पन्नाच्या तुलनेत २२.२९ टक्के जास्त असल्याचे चौकशीत समोर आले आहे.
दोघांविरुद्ध अपसंपदेचा गुन्हा नोंदला आहे. अधिक तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक गणेश कुंभार करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज