टीम मंगळवेढा टाईम्स ।
अटक व प्रतिबंधात्मक कारवाई न करण्यासाठी ४ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी, गुन्हा दाखल असलेल्या पोलीस हवालदाराची पंढरपूर जिल्हा न्यायाधीशांनी निर्दोष मुक्तता केली.
महादेव विठोबा मेटकरी (रा.मंगळवेढा-पंढरपूर ) असे निर्दोष झालेल्या हवालदाराचे नाव आहे.
तक्रारदार किरण बाळासाहेब डांगे यांचे तुषार हॉटेल होते. दि.३० नोव्हेंबर २०१२ रोजी हॉटेल कामगार,
हॉटेल मालक व ग्राहक यांच्यामध्ये हाणामारी झाली होती. दि.१ डिसेंबर रोजी ५ ते ६ लोकांवर सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
किरण डांगे यांना अटक न करण्यासाठी व पुढील कलम १५१ ची प्रतिबंधात्मक कारवाई न करण्यासाठी ४ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले होते.
आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीशांनी त्यांची निर्दोष मुक्तता केली. आरोपीतर्फे अॅड.राहुल खंडाळे यांनी तर सरकार तर्फे अॅड .आनंद कुईकर यांनी काम पाहिले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज