मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
एसटी महामंडळाने तयार केलेल्या अॅपच्या माध्यमातून प्रवाशांना लालपरीचे लोकेशन मोबाइलवर कळणार आहे. एसटी तिकिटावर असलेल्या क्रमांकाच्या माध्यमातून बस स्टॅन्डवर येण्याची अचूक वेळ समजणार आहे.
एसटीच्या ताफ्यातील सर्वच गाड्यांना व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टिम (व्हीएलटी) बसविण्यात आले असल्याने अॅपवर बसची माहिती उपलब्ध होणार आहे.
राज्यभरात ५० हजार मार्गावर एसटीच्या सुमारे सव्वालाख फेऱ्या होत असतात. त्यांच्या माध्यमातून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात.
तिकिटावर असलेला ट्रिप कोड पहा
■ प्रवाशांनी काढलेल्या तिकिटावर असलेला ट्रिप कोड एसटीच्या अॅप्लिकेशनमध्ये ट्रॅक बसवर टाकल्यावर तिचे लोकेशन समजणार आहे. इतर मार्गावरील गाड्या, त्यांची वेळ, त्या सर्व गाड्यांचे थांबे हे देखील समजणार आहेत.
■ यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मुंबई सेंट्रल मध्यवर्ती कार्यालयात अद्ययावत नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे.
सर्व रूटचे मॅपिंग पूर्ण झाले
• लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आगाऊ तिकीट काढूनही बस नेमकी कोणत्या ठिकाणी आली, मधल्या थांब्यावर एसटी नेमकी कधी येणार याची माहिती मिळत नसल्याने तासन् तास ताटकळत राहावे लागते.
• यासाठी महामंडळाने तयार केलेल्या व्हीएलटीच्या मदतीने बसचे थांबे आणि त्यांच्या निवडलेल्या स्थानकामध्ये ती येण्याचा अपेक्षित वेळ अगदी २४ तास अगोदर समजणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
यासाठी नेमण्यात आलेल्या रोस मार्टी 3 कंपनीकडून रूट मॅपिंग पूर्ण झाले असून त्याचे सिस्टिममध्ये इंटिग्रेशनही पूर्ण झाले आहे. सध्या वार्षिक ऑपरेशनल पॅटर्नमधील बदल त्यामध्ये इंटिग्रेट करणे सुरू असून येत्या काही आठवड्यांमध्ये हे काम पूर्ण होणार आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज