टीम मंगळवेढा टाईम्स ।
मनाचा ठाम निश्चय,अंगी जिद्द, चिकाटी व अभ्यासात सातत्य असले,तर कुठलीही गोष्ट शक्य होऊ शकते. हे निंबोणी (ता. मंगळवेढा)येथील सामान्य कुटुंबातील प्रणाली नरसप्पा माळी या तरुणीने सिद्ध केले आहे.
ती महाराष्ट्र सरकार तर्फे घेण्यात येणाऱ्या सरळ सेवा परीक्षेतून ती चार महिन्यापूर्वी उपविभागीय भुमिअभिलेख मंगळवेढा येथे कनिष्ठ लिपिक/भूकरमापक पदावर सध्या कार्यरत आहे.
तसेच सोलापूर महानगरपालिका सोलापूर येथे ओबीसी प्रवर्गातून प्रथम क्रमांकाने सहाय्यक कनिष्ठ अभियंता, सोलापूर जिल्हा परिषद सोलापूर येथे ओबीसी प्रवर्गातून तृतीय क्रमांकाने सहाय्यक कनिष्ठ अभियंता, जलसंपदा विभाग सातारा येथे सहाय्यक कनिष्ठ अभियंता पदी निवड झालेली आहे.
प्रणालीला खाजगी कंपनीत नोकरीची संधी मिळत होती,पण शिक्षण आणि अभ्यासाची आवड असल्याने तिने स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अधिकारीपद मिळवून समाजसेवेचा संकल्प केला.
जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर एकाच वेळी सरकारी नोकरीच्या चार परीक्षा उत्तीर्ण होत घवघवीत यश मिळवले.
तिचे पहिली ते चौथीपर्यंत शिक्षण जि.प.माळी वस्ती शाळा,निंबोणी येथे झाले. पाचवी ते दहावीचे शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल,निंबोणी येथे झाले. दहावीनंतर शासकीय महिला निवासी तंत्रनिकेतन,
तासगाव येथे सिव्हिल इंजिनिअरिंग पूर्ण केले. बी.टेक सिव्हिल शिवाजी युनिव्हर्सिटी,कोल्हापूर येथून प्रथम श्रेणी मधून उत्तीर्ण झाली.
यश मिळवण्यासाठी जिद्द, सातत्य, चिकाटी व प्रयत्न गरजेचे
”स्पर्धा परीक्षेचा अभ्यास नीट समजून घेत, वेळेचे नियोजन केले. आठ ते दहा तास अभ्यास करण्याची तयारी ठेवली. माझ्या यशामध्ये माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य व शिक्षकांचा मोठा वाटा आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी जिद्द, सातत्य, चिकाटी व प्रयत्न गरजेचे असते.”- प्रणाली माळी
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज