पंढरपूर । राजेंद्र फुगारे
पंढरपूर शहरातील सर्वात जुनी व आर्थिक दृष्ट्या महत्वाची असणारी 110 वर्षे पूर्ण केलेली पंढरपूर अर्बन को. ऑप. बँकेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली आहे.
आज अर्ज छाननीच्या दिवशी माजी आमदार व बँकेचे विद्यमान चेअरमन प्रशांतराव परिचारक यांच्या पॅनलचे 17 जागांसाठी भरलेले 18 अर्ज वैद्य ठरले व विरोधकांचे सर्व अर्ज अवैद्य ठरले त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध ठरली आहे.
पंढरपूर अर्बन सहकारी बँकेची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली होती. मंगळवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस होता. संचालक मंडळाची पाच वर्षाची मुदत अडीच वर्षांपूर्वीच संपली होती.
मात्र कोरोनामुळे अडीच वर्षानंतर निवडणूक प्रक्रीया जाहीर झाली आहे. माजी आमदार प्रशांत परिचारक हे मागील बारा वर्षांपासून बँकेचे चेअरमन आहेत.
निवडणुकीसाठी मंगळवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी 17 जागांसाठी 36 उमेदवारांनी एकूण 38 अर्ज दाखल केले होते. सत्ताधारी पांडुरंग परिवारासह विरोधी समविचारी आघाडीने देखील सर्व जागांसाठी उमेदवारी अर्ज काल दाखल केले होते.
बँकेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी सत्ताधारी पांडुरंग परिवाराच्या अठरा उमेदवारांनी अठरा अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये बँकेचे विद्यमान अध्यक्ष प्रशांत परिचारक यांच्यासह त्यांचे चुलत बंधू राजाराम परिचारक,
रजनीश कवठेकर, हरिष ताठे, सतीश मुळे, पांडुरंग घंटी, शांताराम कुलकर्णी, अनिल अभंगराव, मनोज सुरवसे, ऋषिकेश उत्पात, विनायक हरिदास, अमित मांगले, अनंत कटप, गणेश शिंगण, व्यंकटेश कौलवार, गजेंद्र माने, माधुरी जोशी व डॉ.संगिता पाटील यांना नवीन संचालक मंडळात संधी मिळाली आहे.
मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी विविध पक्ष व संघटनांना एकत्र करून पंढरपूर अर्बन बँक बचाव समविचारी आघाडीने स्थापन केली होती. या आघाडीकडून माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले, महादेव भालेराव, दिनेश गिड्डे, श्रीकांत शिंदे, मंदार बडवे, महेश उत्पात, हरिदास शिरगिरे, अशोक बंदपट्टे, एकनाथ सुर्वे, हनुमंत बाबर, बजरंग थिटे, रमेश थिटे, राजकुमार जाधव, मधुकर चव्हाण, छाया खंडागळे, रत्नमाला पुणेकर व जनाबाई अवघडे यांचे अर्ज दाखल झाले होते. मात्र आजच्या छाननी मध्ये हे सर्व अर्ज अवैध ठरले आहेत.
आजवर अर्बन बँकेसाठी विरोधी गटाकडून पूर्ण पॅनल कधीही उभा राहिले नाही. बँकेच्या पंढरपूर शहरासह, मंगळवेढा सांगोला मोहोळ सोलापूर बारामती पुणे या ठिकाणासह एकूण 19 शाखा आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज