मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
हद्दपारीच्या आदेशाचा भंग करून पंढरपुरात वावरणाऱ्या एका आरोपीला गुरूवारी ( दि . २० ) सायंकाळी शहर पोलिसांनी पकडले . यादरम्यान , त्याने पोलिसांना धक्काबुक्की व दमदाटी केल्याने त्याच्याविरूध्द शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे . मल्हार ऊर्फ मल्लाप्पा हरीभाऊ कडलासकर ( वय २८ , रा . झेंडे गल्ली ) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नांव आहे . गुन्हेगारी कृत्यांच्या पार्श्वभूमिवर कडलासकर याला ऑक्टोबर २०१९ मध्ये २ वर्षासाठी हद्दपार करण्याबाबतचे आदेश जिल्हा पोलीस प्रमुखांनी दिले होते . त्यानुसार नोटीस बजावणी व कार्यवाही करण्यात आली होती . तरीही गुरूवारी सायंकाळी कडलासकर हा आदेशाचा भंग करून झेंडे गल्लीतील त्याच्या घरासमोर वावरताना शहर पोलिसांना दिसून आला . त्यामुळे पोलिसांनी त्याला पकडले . यादरम्यान पोलिसांना दमदाटी व धक्काबुक्की करून त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला .
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज