mangalwedhatimes.in
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यात कोविड सेंटर लवकर सुरू करावेत : समाधान आवताडे

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
April 26, 2021
in सोलापूर

टीम मंगळवेढा टाईम्स । 

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीनंतर दोन्ही तालुक्यात रुग्ण संख्या वाढत आहे, त्या पार्श्वभूमीवर कोविड सेंटर लवकर सुरू करावेत, रुग्णांवर वेळेवर उपचार व्हावेत, गोळ्या औषधांवर बरे होणारे रुग्ण ऑक्सीजन वर किंवा व्हेंटिलेटरवर जाऊ नये, यासाठी वेळेवरच उपाययोजना कराव्यात अशी मागणी  दामाजी कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे यांनी केली आहे.

मंगळवेढा तालुक्यातील मरवडे ,भोसे ,आंधळगाव,बोराळे, लक्ष्मी दहिवडी व पंढरपूर तालुक्यातील कासेगाव ,गादेगाव, खर्डी इतर पाच हजार लोकसंख्येच्या पुढील गावात कोविड सेंटर जिल्हा परिषद मार्फत सुरू करण्याची मागणी आवताडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे केले आहे.

दरम्यान जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी जिल्ह्यातील 5 हजार लोकसंख्या असलेल्या गावात कोविड केअर सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या धर्तीवर मंगळवेढा व पंढरपूर तालुक्यातील गावात लवकरात लवकर कोबिर सेंटर सुरू करून रुग्णांना दिलासा द्यावा अशी आग्रहाची मागणी समाधान आवताडे यांनी केली आहे.

सदर बैठकीत दामाजी कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे म्हणाले की, नुकत्याच संपन्न झालेल्या पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूक नंतर वाढलेली रुग्ण संख्या पाहता तालुकास्तरावर या महामारीचा प्रकोप आटोक्यात आणण्यासाठी काही दिवसांपूर्वी मी स्वतः मंगळवेढा येथील आढावा बैठकीदरम्यान जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व इतर प्रशासकीय आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन सर्वतोपरी सहकार्य अनुषंगाने मदत करण्याचे अभिवचन दिले आहे. या महामारीचा मुकाबला करण्यासाठी सर्वांनी राजकीय जोडे बाजूला ठेवून एकदिलाने व समन्वयाने कार्य करणे खूप आवश्यक आहे असे त्यांनी सांगितले.

सोलापूर जिल्ह्यात कोविड केअर सेंटर सुरू करण्यासाठी तातडीने उपाययोजना करा अशा सूचना जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी प्रशासनास केल्या आहेत.

ग्रामीण भागात वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या वतीने कोविड केअर सेंटर उभारण्याबाबत महत्वाची बैठक अर्थ व बांधकाम सभापती विजयराज डोंगरे यांच्या शासकीय निवासस्थानी पार पडली.

याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे हे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.

या बैठकीला उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, सदस्य आनंद तानवडे, मदन दराडे, अँड.सचिन देशमुख, बाळासाहेब देशमुख, गणेश पाटील, अतुल पवार, अजित तळेकर, मुख्य वित्त व लेखा अधिकारी अजयसिंह पवार, आरोग्य अधिकारी डॉ.शितलकुमार जाधव, वरिष्ठ लेखा अधिकारी सुर्वे, सरोज काझी, देवानंद गुंड , सरपंच डॉ अमित व्यवहारे, आष्टी ग्रामसेवक गडेकर हे उपस्थित होते.

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या नंतर दोन्ही तालुक्यात कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत, त्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची होती, कोव्हीड केअर सेंटर उभे करण्यासाठी निधीची उपलब्धता कशी होणार याची चर्चा झाली.

लवकरच लवकर संपर्कातील व्यक्ती शोधून त्यांना वेळेवर उपचार व नियंत्रणाखाली ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी जिल्ह्यातील 5 हजार लोकसंख्या असलेल्या गावात कोविड केअर सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या विषयावर चर्चा झाली, लवकरात लवकर हे सेंटर उभे करून कोरोना बाधितांवर उपचार करण्याचा निर्णय झाला.

याप्रसंगी सदस्य तानवडे, दराडे, अँड.देशमुख यांनी विविध सूचना केल्या, या बैठकीत सरपंच डॉ अमित व्यवहारे यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून कोविड सेंटरला आपली सेवा देण्याची तयारी दर्शवली.

सभापती विजयराज डोंगरे म्हणाले, झेडपीचा कोविड केअर सेंटर उभारण्याचा निर्णय स्तुत्य आहे, झेडपी सेस, आरोग्य विभागाचा निधी राज्य सरकारचा निधी वापर करावा, मोहोळ तालुक्यात आष्टी, शेटफळ, नरखेड, कुरुल, कामती, बेगमपूर याठिकाणी कोविड केअर सेंटर लवकरच सुरू होणार आहेत.

ADVERTISEMENT

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: कोरोना आढावासमाधान आवताडे
ADVERTISEMENT

संबंधित बातम्या

धक्कादायक! पंढरपुरात तब्बल 137 भाविकांना अन्नातून विषबाधा; होऊ लागला मळमळ-उलटीचा त्रास

धक्कादायक! पंढरपुरात तब्बल 137 भाविकांना अन्नातून विषबाधा; होऊ लागला मळमळ-उलटीचा त्रास

February 2, 2023
अंगणवाडी सेविकांची निघाली भरती, सोलापूर जिल्ह्यात ‘एवढ्या’ जागा; शिक्षण अट, उमेदवार निवडीचा अधिकार, अर्ज प्रक्रिया सविस्तर माहिती जाणून घ्या..

अंगणवाडी सेविकांची निघाली भरती, सोलापूर जिल्ह्यात ‘एवढ्या’ जागा; शिक्षण अट, उमेदवार निवडीचा अधिकार, अर्ज प्रक्रिया सविस्तर माहिती जाणून घ्या..

February 1, 2023
सोलापूरकरांनो! साडेसहा तासांत पोचा मुंबईला, सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस; पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवणार हिरवा झेंडा

सोलापूरकरांनो! साडेसहा तासांत पोचा मुंबईला, सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस; पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवणार हिरवा झेंडा

January 30, 2023
शरद पवार आज व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून मंगळवेढेकरांशी साधणार संवाद

मोठी बातमी! शरद पवार तब्बल नऊ वर्षानंतर मंगळवेढा दौऱ्यावर; आज ‘या’ सोहळ्यास उपस्थित राहणार

January 28, 2023
शेतकऱ्यांना अपुऱ्या व विस्कळीत वीज पुरवठ्यापासून दिलासा; नवीन डीपी व क्षमतावाढसाठी ६ कोटी ४९ लाखांचा निधी मंजूर; आ.समाधान आवताडे यांची माहिती

मतदारसंघातील दलित समाजाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात प्रथमतःच निधी मंजूर; आ.आवताडे यांच्या कार्यपद्धतीवर संपूर्ण समाज जाम खुश; निधी मंजूर झालेली गावे व कामे पाहा..

January 25, 2023
जिल्हाधिकारी साहेब! वाळू माफियांची दहशत वाढली; वाळू ठेकदाराकडून शेतकऱ्यांना मारहाण

लाडाचा जावई! माहेरात गेलेल्या पत्नीला परत आणण्यासाठी गेलेल्या जावयाला सासुरवाडीत बेदम मारहाण

January 25, 2023
महाराष्ट्र केसरी! सिकंदर शेख पराभूत, मंगळवेढ्याचा महेंद्र गायकवाड फायनलमध्ये

एकाच मैदानात दोघेही! महेंद्र गायकवाड अन् सिकंदर शेख पुन्हा एका आखाड्यात; या लक्षवेधी लढतींकडे असणार लक्ष

January 23, 2023
हळदी-कुंकू समारंभात विधवा महिलांना सुवासिनी अन् संक्रांतीच्या वाणाचा मान; मंगळवेढ्यातील अनोख्या उपक्रमाची चर्चा

हळदी-कुंकू समारंभात विधवा महिलांना सुवासिनी अन् संक्रांतीच्या वाणाचा मान; मंगळवेढ्यातील अनोख्या उपक्रमाची चर्चा

January 23, 2023
एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना मंगळवेढ्यातील तत्कालीन मंडळअधिकारी रंगेहाथ सापडला

एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना मंगळवेढ्यातील तत्कालीन मंडळअधिकारी रंगेहाथ सापडला

January 21, 2023
Next Post
सोलापूर ब्रेकिंग! ‘या’ तालुक्यातील ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यास अख्ख्या गावाला मोफत रक्तपुरवठा

कोरोनाची दहशत! मंगळवेढ्यातील 'या' गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात; गावकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

ताज्या बातम्या

धक्कादायक! पंढरपुरात तब्बल 137 भाविकांना अन्नातून विषबाधा; होऊ लागला मळमळ-उलटीचा त्रास

धक्कादायक! पंढरपुरात तब्बल 137 भाविकांना अन्नातून विषबाधा; होऊ लागला मळमळ-उलटीचा त्रास

February 2, 2023
मंगळवेढयातील मुला-मुलींसाठी नोकरीची संधी; ‘या’ दुकानात सेल्समन पदासाठी होणार आहे मोठी भरती

मंगळवेढ्यात ‘या’ मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स & मोबाईल शॉपीमध्ये नोकरीची संधी, घडवा एक लखलखते करियर; आजच करा अर्ज

February 2, 2023
दामाजी कारखान्याकडून अँडव्हान्स ऊसबिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा; ‘हा’ प्रकल्प उभारण्यात येणार

आला उन्हाळा! अमर इलेक्ट्रॉनिक्स आयोजित AC सर्विस कैम्प, A.C. कोणताही असो, कोठूनही घेतला असो सर्विस आम्ही देणार; तेही 50% डिस्काउंट सहित; संपर्क:-9975786514

February 2, 2023
शिवशंभो कलेक्शन आता नवीन जागेत; दिवाळी निमित्त खरेदीवर 10 टक्के डिस्काउंट

मंगळवेढ्यात कपड्यांचा अनोखा मॉल; 10 हजारांच्या खरेदीवर अनामिका क्लॉथ सेंटरकडून पाच हजारांची खरेदी मोफत

February 2, 2023
उत्सुकता संपली! दामाजी कारखान्याच्या अध्यक्षपदी शिवानंद पाटील तर उपाध्यक्षपदी ‘हे’ नाव निश्चित; आज होणार शिक्कामोर्तब

दामाजी कारखान्याकडून अँडव्हान्स ऊसबिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा; ‘हा’ प्रकल्प उभारण्यात येणार

February 2, 2023
अंगणवाडी सेविकांची निघाली भरती, सोलापूर जिल्ह्यात ‘एवढ्या’ जागा; शिक्षण अट, उमेदवार निवडीचा अधिकार, अर्ज प्रक्रिया सविस्तर माहिती जाणून घ्या..

अंगणवाडी सेविकांची निघाली भरती, सोलापूर जिल्ह्यात ‘एवढ्या’ जागा; शिक्षण अट, उमेदवार निवडीचा अधिकार, अर्ज प्रक्रिया सविस्तर माहिती जाणून घ्या..

February 1, 2023
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा