mangalwedhatimes.in
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

कोरोनाची दहशत! मंगळवेढ्यातील ‘या’ गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात; गावकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
April 26, 2021
in मंगळवेढा, सोलापूर
सोलापूर ब्रेकिंग! ‘या’ तालुक्यातील ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यास अख्ख्या गावाला मोफत रक्तपुरवठा

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा तालुक्यातील मरवडे या साडे सहा हजार लोकवस्तीच्या गावामध्ये कोरोना आजाराने थैमान घातले असून मरवडे गाव दि. 20 एप्रिल रोजी प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले असले तरी प्रत्यक्ष पाच दिवस हा आदेश दडपून ठेवून कुठल्याही उपाययोजना न केल्याने गेल्या आठ दिवसांत 10 नागरिकांना आपल्या प्राणास मुकावे लागले आहे.

कोरोनाकाळात प्रशासकीय यंत्रणेकडून अक्षम्य दुर्लक्ष झाल्याने नागरिकांचे जिवीत धोक्यात आले असून या प्रकाराची चौकशी होवून तातडीच्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी मंगळवेढा तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष अॕड.नंदकुमार पवार यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे केली आहे.

मरवडे गावाचा एक कि.मी. परिसरातील परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून दि. 20 एप्रिल पासून प्रांताधिकारी यांनी घोषित केल्याच्या आदेशाची प्रत दि. 25 रोजी रात्री नागरिकांच्या माहितीसाठी सोशल मिडीयातून प्रसिद्ध केली आहे.

मात्र त्या अनुषंगाने प्रशासकीय पातळीवर कुठल्याही प्रकारची उपाययोजना करण्यात आलेली नाही अथवा खबरदारी घेण्यात आलेली नाही याकडे निवेदनाद्वारे वरिष्ठांचे लक्ष वेधण्यात आले आहे.

तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष अॕड.नंदकुमार पवार व मरवडे ग्रामपंचायत सदस्य संजय पवार यांनी सर्व वरिष्ठ प्रशासकीय अधिकार्यांशी संपर्क साधून वस्तुस्थितीची जाणिव करुन दिली आहे.

त्याचबरोबर मरवडे येथील स्वाभिमानी ग्रामविकास आघाडीने याबाबतीत सविस्तर निवेदन देऊन मरवडे गावातील परिस्थिती व करावयाच्या उपाययोजनांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.त्यामध्ये नमूद करण्यात आलेल्या बाबी पुढीलप्रमाणे.

मयत 10 रुग्णांच्या कुटुंबाकडून मृत्यूच्या कारणांची शहानिशा व्हावी व त्या कुटुंबातील अन्य सदस्यांच्या आरोग्याची योग्य काळजी घेण्यात यावी. मरवडे गाव प्रतिबंधित करण्याचा आदेश पाच दिवस दडपून ठेवण्यामागील कारणांची चौकशी व्हावी.

प्रतिबंधित क्षेत्र घोषित झाल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा व ग्रामसुरक्षा समितीने कोणत्या उपाययोजना केल्या व खबरदारी घेतली याचा आढावा घेण्यात यावा. प्रा.आ. केंद्रातील सर्व आरोग्य कर्मचारी यांच्या कोरोना चाचण्या घेऊन सर्व स्टाफ पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे का ? याची शहानिशा करण्यात यावी.

वाढते रुग्ण व मृत्यूचे प्रमाण विचारात घेऊन खास बाब म्हणून अतिरिक्त वाढीव आरोग्य सुविधा मरवडे आरोग्य केंद्रासाठी पुरविण्यात याव्यात.संस्था विलगीकरण कक्षामध्ये सुविधांच्या अभावामुळे होणारी हेळसांड थांबवावी.

ज्या रुग्णांना होम क्वारंटाईनची अनुमती दिलेली आहे त्यांची नियमित तपासणी व्हावी .ग्रामपंचायतीने गेल्या पंधरा दिवसांत प्रतिबंधात्मक कोणत्या उपाययोजना केल्या याचा आढावा घेऊन योग्य ते आदेश देण्यात यावेत.

कारणांशिवाय रस्त्यावर येणाऱ्या नागरिकांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.चाचण्यांचे प्रमाण वाढविणे , लसीकरण करणे यादृष्टीने ठोस कार्यक्रम आखण्यात यावा.

या निवेदनाच्या पालकमंत्री दत्तात्रय भरणे , जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर , मुख्य कार्यकारी अधिकारी दिलिप स्वामी , चंचल पाटील , प्रांताधिकारी उदयसिंह भोसले , तहसिलदार स्वप्निल रावडे , जिल्हा आरोग्य अधिकारी यांना पाठविण्यात आल्याचे स्वाभिमानी ग्रामाविकास आघाडीचे गटनेते तथा ग्रामपंचायत सदस्य संजय पवार यांनी सांगितले.

ADVERTISEMENT

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: कोरोना उद्रेकमरवडे
ADVERTISEMENT

संबंधित बातम्या

धक्कादायक! पंढरपुरात तब्बल 137 भाविकांना अन्नातून विषबाधा; होऊ लागला मळमळ-उलटीचा त्रास

धक्कादायक! पंढरपुरात तब्बल 137 भाविकांना अन्नातून विषबाधा; होऊ लागला मळमळ-उलटीचा त्रास

February 2, 2023
मंगळवेढयातील मुला-मुलींसाठी नोकरीची संधी; ‘या’ दुकानात सेल्समन पदासाठी होणार आहे मोठी भरती

मंगळवेढ्यात ‘या’ मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स & मोबाईल शॉपीमध्ये नोकरीची संधी, घडवा एक लखलखते करियर; आजच करा अर्ज

February 2, 2023
दामाजी कारखान्याकडून अँडव्हान्स ऊसबिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा; ‘हा’ प्रकल्प उभारण्यात येणार

आला उन्हाळा! अमर इलेक्ट्रॉनिक्स आयोजित AC सर्विस कैम्प, A.C. कोणताही असो, कोठूनही घेतला असो सर्विस आम्ही देणार; तेही 50% डिस्काउंट सहित; संपर्क:-9975786514

February 2, 2023
शिवशंभो कलेक्शन आता नवीन जागेत; दिवाळी निमित्त खरेदीवर 10 टक्के डिस्काउंट

मंगळवेढ्यात कपड्यांचा अनोखा मॉल; 10 हजारांच्या खरेदीवर अनामिका क्लॉथ सेंटरकडून पाच हजारांची खरेदी मोफत

February 2, 2023
उत्सुकता संपली! दामाजी कारखान्याच्या अध्यक्षपदी शिवानंद पाटील तर उपाध्यक्षपदी ‘हे’ नाव निश्चित; आज होणार शिक्कामोर्तब

दामाजी कारखान्याकडून अँडव्हान्स ऊसबिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा; ‘हा’ प्रकल्प उभारण्यात येणार

February 2, 2023
अंगणवाडी सेविकांची निघाली भरती, सोलापूर जिल्ह्यात ‘एवढ्या’ जागा; शिक्षण अट, उमेदवार निवडीचा अधिकार, अर्ज प्रक्रिया सविस्तर माहिती जाणून घ्या..

अंगणवाडी सेविकांची निघाली भरती, सोलापूर जिल्ह्यात ‘एवढ्या’ जागा; शिक्षण अट, उमेदवार निवडीचा अधिकार, अर्ज प्रक्रिया सविस्तर माहिती जाणून घ्या..

February 1, 2023
मंगळवेढ्यातून भरदिवसा मोटारसायकलची चोरी; घरफोडी, मोटारसायकल चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ; ‘या’ ठिकाणी झाल्या चोऱ्या

पोलिसांना चॅलेंज! हळदीच्या कार्यक्रमाला कुटूंब गेल्याने मंगळवेढ्यात चोरट्याने मारला तिजोरीवर दिवसाढवळ्या डल्ला

February 1, 2023
धक्कादायक! मंगळवेढ्यात पतीचा पत्नीवर चाकू हल्ला; कारण वाचून थक्क व्हाल…पती विरूध्द गुन्हा दाखल

मंगळवेढ्यात झाडे तोडण्याच्या कारणावरुन एका महिलेस चावा घेवून कोयत्याने केला हल्ला

February 1, 2023
खळबळजनक! मंगळवेढ्यात तरुणावर तलवारीने हल्ला; कारण फक्त… तिघांवर गुन्हा दाखल

मंगळवेढ्यात ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टर मालकाचा कारखान्यातील दोन कर्मचार्‍यावर कोयत्याने हल्ला

January 31, 2023
Next Post
संतापजनक! मंगळवेढ्यात अठरा वर्षीय मुलीवर अत्याचार; दोघाविरूध्द बलात्काराचा गुन्हा दाखल

सरकारी रखवालदारचं निघाले वाळू चोर; तलाठ्यासह सहाजणांना अटक; पंढरपूर तालुक्यातील घटना

ताज्या बातम्या

बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

दहावी बारावी परीक्षेबाबत विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना, परीक्षेला उशीरा याल तर परीक्षेला मुकाल; यावर्षी असणार असे बदल

February 2, 2023
धक्कादायक! पंढरपुरात तब्बल 137 भाविकांना अन्नातून विषबाधा; होऊ लागला मळमळ-उलटीचा त्रास

धक्कादायक! पंढरपुरात तब्बल 137 भाविकांना अन्नातून विषबाधा; होऊ लागला मळमळ-उलटीचा त्रास

February 2, 2023
मंगळवेढयातील मुला-मुलींसाठी नोकरीची संधी; ‘या’ दुकानात सेल्समन पदासाठी होणार आहे मोठी भरती

मंगळवेढ्यात ‘या’ मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स & मोबाईल शॉपीमध्ये नोकरीची संधी, घडवा एक लखलखते करियर; आजच करा अर्ज

February 2, 2023
दामाजी कारखान्याकडून अँडव्हान्स ऊसबिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा; ‘हा’ प्रकल्प उभारण्यात येणार

आला उन्हाळा! अमर इलेक्ट्रॉनिक्स आयोजित AC सर्विस कैम्प, A.C. कोणताही असो, कोठूनही घेतला असो सर्विस आम्ही देणार; तेही 50% डिस्काउंट सहित; संपर्क:-9975786514

February 2, 2023
शिवशंभो कलेक्शन आता नवीन जागेत; दिवाळी निमित्त खरेदीवर 10 टक्के डिस्काउंट

मंगळवेढ्यात कपड्यांचा अनोखा मॉल; 10 हजारांच्या खरेदीवर अनामिका क्लॉथ सेंटरकडून पाच हजारांची खरेदी मोफत

February 2, 2023
उत्सुकता संपली! दामाजी कारखान्याच्या अध्यक्षपदी शिवानंद पाटील तर उपाध्यक्षपदी ‘हे’ नाव निश्चित; आज होणार शिक्कामोर्तब

दामाजी कारखान्याकडून अँडव्हान्स ऊसबिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा; ‘हा’ प्रकल्प उभारण्यात येणार

February 2, 2023
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..