टीम मंगळवेढा टाईम्स ।
अखिल भाविक वारकरी मंडळाच्या पंढरपूर विभाग सोलापूर जिल्हाध्यक्ष पदी ज्ञानेश्वर भगरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
अखिल भाविक वारकरी मंडळाची राष्ट्रीय कार्यकारणी बैठक रविवारी डॉ.निर्मलकुमार फडकुले सभागृह सोलापूर येथे पार पडली.
सदर बैठकीच्या अध्यक्षपदी मंडळाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ह.भ.प.भागवत चवरे महाराज हे होते.
गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून मंगळवेढा व पंढरपूर तालुक्यामध्ये नुतन जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर भगरे यांनी भागवत धर्माच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी प्रत्येक एकादशी सोहळ्यादिवशी भजन, कीर्तन अशा पद्धतीने अनेक विधायक कार्यक्रम घेतले आहेत.
मंडळाच्या शहराध्यक्ष म्हणून आपली जबाबदारी पार पाडत असताना त्यांनी दोन मोठे वारकरी मेळावा घेतले होते. सांप्रदायिक आणि अध्यात्मिक कार्य परंपरेचा सुरेख संगम साधून वारकरी धर्म अभिप्रेत कार्य केल्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या खांद्यावर नवीन जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
नुतन जिल्हाध्यक्ष भगरे यांच्या कार्याची व्यापकता आणि कार्य करण्याची आवड यांची गोळाबेरीज पाहता गेली काही वर्षे त्यांना सोलापूर जिल्हा सहअध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती.
सदर जबाबदारी सांभाळत असताना त्यांनी आता नव्याने मंगळवेढा, सांगोला, पंढरपूर, माळशिरस, करमाळा, माढा या सहा तालुक्यामध्ये आपल्या कार्याची छाप पाडली आहे.
वारकरी परंपरेतील त्यांची कार्य सचोटी आणि सतत नवनवीन कार्यक्रमांचे आयोजन यांचा विचार करून राष्ट्रीय कार्यकारणीने त्यांना जिल्हाध्यक्षपदी नियुक्त केले आहे.
या बैठकीसाठी अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह. भ. प. सुधाकर इंगळे महाराज, माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख, माजी नगरसेवक अमोल शिंदे, महानगरपालिका माजी सभागृह नेते शिवानंद पाटील,उद्योगपती दत्ताआण्णा सुरवसे, कल्याण रोकडे,
मल्लिकार्जुन राजमाने, निलेश गुजरे, अविनाश नांद्रेकर,आदी मान्यवर व वारकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज