टीम मंगळवेढा टाईम्स ।
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी दाखल झालेल्या ११७ पैकी २५ उमेदवारी अर्ज छाननीत अवैध ठरले. १८ जार्गासाठी उर्वरित ९२ अर्ज वैध ठरले आहेत. दि. २० एप्रिल ही अर्ज मागे घेण्याची अखेरची मुदत असून त्यानंतरच ही निवडणूक लागणार की बिनविरोध होणार ? हे चित्र स्पष्ट होणार आहे.
परिचारक गटाची गेल्या अनेक वर्षांपासून एकहाती सत्ता असलेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत यावेळेस पुन्हा एकदा सत्ताधारी आहेत. गटाने जय्यत तयारी केली आहे. याउलट विरोधी विठ्ठल परिवाराची गट-तटात विभागणी झाली असून भरीस भर म्हणून शेतकरी संघटनांनीही स्वतंत्रपणे कांही जागांवर उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
सुरूवातीला ही निवडणूक बिनविरोध होईल, असे चित्र असताना १८ जागांसाठी विक्रमी तब्बल ११७ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने सर्वच गट-तटांमधील राजकीय केले आहेत. वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे.
विशेष म्हणजे, या निवडणुकीत आ. समाधान आवताडे गटाच्याही अनेक इच्छुकांनी स्वतंत्रपणे उमेदवारी अर्ज दाखल केले. पारंपारिक विरोधक असलेल्या विठ्ठल परिवाराने सध्या तरी एकजूट न होता स्वतंत्रपणे अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये ‘विठ्ठल’चे चेअरमन अभिजीत पाटील, माजी चेअरमन भगीरथ भालके, कल्याणराव काळे या गटांच्या इच्छुकांचा समावेश आहे. तसेच
शेतकरी संघटनांनीही कांही जागा लढविण्याचे संकेत देत आपले उमेदवारी अर्ज दाखल छाननी प्रक्रियेत ११७ पैकी २५ उमेदवारी अर्ज अवैध ठरले, तर उर्वरित ९२ अर्ज वैध ठरले. संस्था आणि शेतकऱ्यांचे हित लक्षात घेत ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करून परिचारक गटाने विरोधकांनाही साद घातली आहे. मात्र, अजून तरी कोणताच गट-तट चर्चेला समोर आलेला नाही.
अभिजीत पाटील आणि विठ्ठल परिवाराच्या माध्यमातून मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढविणार असल्याचे संकेत दिले आहेत. २० एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. त्यामुळे तोपर्यंत कोणत्या घडामोडी घडतात? बाजार समितीसाठी लढत होणार की बिनविरोध होणार? याविषयी ‘वेट अॅन्ड वॉच’ राहणार आहे.
मतदारसंघनिहाय उमेदवारांची संख्या
आवश्यकता भासल्यास २१ एप्रिल २०२३ रोजी पात्र उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. २८ एप्रिल २०२३ रोजी मतदान घेण्यात येणार आहे. मतदारसंघनिहाय पात्र उमेदवारांची संख्या याप्रमाणे; सहकारी संस्था मतदारसंघ : अ) सर्वसाधारण- ३१, ब) महिला राखीव – ९, क) इतर मागासवर्गीय – ३, ड) विमुक्त जाती / भटक्या जमाती-७ (२) ग्रामपंचायत मतदारसंघ : अ) सर्वसाधारण ३२, ब) अनु. जाती/जमाती-२, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक-२, (३) व्यापारी मतदारसंघ २, (४) हमाल व तोलार मतदारसंघ ४.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज