टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा येथील ग्रामीण रुग्णालयात उभारण्यात आलेल्या 7 के.एल. क्षमतेचा लिक्विड ऑक्सिजन प्लँट नुकताच कार्यान्वित करण्यात आल्याने वाढत्या कोरोना संसर्ग साथीच्या आजारात रुग्णांना या ऑक्सिजन प्लँटमुळे दिलासा मिळणार आहे.
सोलापूर शासकीय रुग्णालयाचे शल्य चिकित्सक डॉ.प्रदिप ढेले यांच्या मार्गदर्शनाखाली हा ऑक्सिजन प्लँट उभारण्यात आला आहे.
मागील मार्च महिन्यात सोलापूर जिल्हयात सर्वत्र कोरोना रुग्णाने अचानक उसळी मारल्याने ऑक्सिजनची खूपच कमतरता भासल्याचा कटू अनुभव रुग्णांना आला होता.
भविष्यात ऑक्सिजनचा प्रश्न भेडसावू नये हा हेतू नजरेसमोर ठेवून डॉ.प्रदिप ढेले यांनी मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात ऑक्सिजन प्लँट उभा करण्याचा सर्वानुमते निर्णय घेतला.
या ऑक्सिजन प्लँटमुळे मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयातील 30 बेडवरील रुग्णांना याचा पुरवठा होणार असून याची क्षमता 1 महिना पुरेल इतपत आहे.
नुकताच लिक्विड ऑक्सिजन भरल्यावर हा प्लँट कार्यान्वित करण्यात आला आहे. सध्या कोरोना रुग्ण संख्येचा आलेख दिवसेंदिवस उंचावत असल्याने भविष्यात या प्लँटमधील ऑक्सिजन रुग्णांना संजीवनी ठरणार आहे.
गतवर्षी ऑक्सिजन अभावी मंगळवेढयात दोन रुग्णांचा तडफडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. बारामतीमधील एका ठेकेदाराने हे काम पूर्ण केले आहे. ऑक्सिजन टाकी स्टेनलेस स्टील असून याचे आयुष्यमान जवळपास 15 ते 20 वर्षे असल्याचे सांगण्यात आले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज