मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
जय मल्हार क्रीडा युवक आणि सेवा मंडळ व बलवान वाकडे मित्रमंडळाच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी रोजी मारूतीच्या पटांगणात विविध वजन गटांतील ‘मंगळवेढा केसरी कुस्ती स्पर्धेचे’ आयोजन करण्यात आल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष मारूती वाकडे यांनी दिली.
जाहिरातीसाठी संपर्क:7588214814
रविवारी प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांच्या हस्ते सकाळी ९ वा. या कुस्त्यांच्या स्पर्धेचेउदघाटन होईल. याप्रसंगी समाधान आवताडे , भगीरथ भालके , राहुल शहा , सुजीत कदम , अजित जगताप , चंद्रकांत घुले , डॉ . सुभाष कदम , रामचंद्र वाकडे , लतीफ तांबोळी , विनायक नागणे , सुनील डोके , सोमनाथ माळी , प्रवीण खवतोडे , राजाराम सूर्यवंशी , महेश दत्तू यांची उपस्थिती असणार आहे.
तर सायंकाळी ४ वाजता ‘ महिला केसरी ‘ कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांच्या हस्ते व अरुणा माळी यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून यावेळी भगीरथी नागणे,अनिता नागणे , सुमन शिंदे , सब्जपरी मकानदार ,रतन पडवळे,जयमाला म्हेत्रे, पारूवाई जाधव,निर्मला माने, राजश्री टाकणे उपस्थित राहणार.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज