स्वप्निल फुगारे । मंगळवेढा टाईम्स
श्री.संत शिरोमणी चोखाबा महाराज यांच्या ६८४ व्या स्मृतीदिन सोहळ्यानिमित्त मंगळवेढा येथे राज्यस्तरीय भव्य संगीत भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याचे चोखाबाराय ट्रस्टचे अध्यक्ष जयराज शेंबडे यांनी सांगितले.
दिनांक १७ व १८ मे २०२२ या दोन दिवसात संगीत भजन स्पर्धा होणार आहेत.
सदर स्पर्धेचे हे तिसरे वर्ष असून शाहू परिवाराच्या वतीने प्रथम क्रमांक पंधरा हजार-सन्मानचिन्ह,द्वितीय क्रमांक दहा हजार-सन्मानचिन्ह,
तृतीय क्रमांक पाच हजार-सन्मानचिन्ह व उत्तेजनार्थ अशी पारितोषिके ठेवण्यात आलेली आहेत तसेच उत्कृष्ठ गायनाचार्य व उत्कृष्ठ मृंदगाचार्य यांनाही पारितोषिके ठेवण्यात आलेली आहेत.
सदर स्पर्धेसाठी मो ९५२७२६९२२६ व मो ७०५७६२५६३६ या क्रमांकावरती दिनांक १६ मे पर्यंत नाव नोंदणी करता येणार आहे.
तरी जास्तीत जास्त संघानी आपली भजन स्पर्धेसाठी नाव नोंदणी करावी असे आवाहन संत शिरोमणी चोखोबाराय ट्रस्ट व वारी परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज