टीम मंगळवेढा टाईम्स ।
संपूर्ण जगात आपलं नाव गाजवणाऱ्या ‘KGF Chapter 2’ या चित्रपटाबद्दल सगळ्यांनाच माहिती झाली आहे. जर तुम्ही देखील हा चित्रपट पाहिला असेल आणि या चित्रपटाचे चाहते असाल तर तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे.
या चित्रपटाशी संबंधित अभिनेते मोहन जुनेजा यांचे 7 मे 2022 रोजी सकाळी निधन झाले.
It’s truly shocking to know that our beloved Monster uncle Mohan Juneja sir is no more💔
We miss you…Rest in peace sir. pic.twitter.com/9VZD3IkaBo
— K.G.F ANALYST🕵🏼♂️ (@KGFAnalyst) May 7, 2022
मोहन जुनेजा यांचे आज सकाळी म्हणजेच 7 मे 2022 रोजी निधन झाले. माहितीनुसार, ते दीर्घ आजाराशी झुंज देत होते.
ते दीर्घकाळ आजारी होते आणि 7 मे रोजी सकाळी त्यांनी बंगळुरू येथील एका खाजगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
मोहन जुनेजा हे त्यांच्या उत्कृष्ट कॉमेडीसाठी ओळखले जातात, त्यांच्या निधनाने त्यांचे चाहते आणि कुटुंबीयांमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत.
मोहन जुनेजा यांनी या चित्रपटात पत्रकार आनंदी यांच्या इन्फॉर्मरची भूमिका साकारली होती. मोहन जुनेजा हे दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध नाव आहे.
मात्र, त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे. त्यांनी 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. मोहन जुनेजा यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीत तमिळ, तेलगू, मल्याळम आणि हिंदी भाषांमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे.
दक्षिण भारतीय अभिनेता मोहन जुनेजा यांना ‘चेलता’ चित्रपटातून मोठा ब्रेक मिळाला आहे. या चित्रपटातील अभिनेत्याची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.
‘वाटारा’सारख्या अनेक टीव्ही मालिकांमध्येही मोहनने आपल्या अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली होती.
मोहन जुनेजा ‘KGF Chapter 1’ आणि ‘KGF Chapter 2’ या सुपरहिट सिनेमांमध्येही दिसला. अभिनेत्याच्या निधनानंतर चाहत्यांकडून सोशल मीडियावर शोक व्यक्त केला जात आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज