टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या आदेशाने सोमवार दि.25 जानेवारी रोजी माझे गाव कोरोनामुक्त गाव अभियान अंतर्गत मंगळवेढयातील 79 ग्रामपंचायत अंतर्गत गावामध्ये प्रभातफेरीचे आयोजन करून जनजागृती करण्यात आली.
दरम्यान, जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय राठोड यांनी ब्रह्मपुरी व माचणूर येथे प्रभातफेरीत सहभागी होवून ग्रामस्थांना कोरोनामुक्त गाव करण्याचा संदेश दिला.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी आपल्या पदाची सुत्रे स्विकारल्यानंतर मार्च महिन्यापासून सुरू असलेल्या कोरोना महामारीचे संकट दूर करण्यासाठी माझे गाव कोरोनामुक्त गाव या अभियानाचा संकल्प हाती घेतला आहे. दि.25 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता कोरोनामुक्त गाव अभियान राबविण्यासाठी सर्व पंचायत समितीना लेखी पत्र देण्यात आले होते.
त्या अनुषंगाने मंगळवेढा तालुक्यातील 79 ग्रामपंचायत अंतर्गत गावामध्ये प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये ग्रामसेवक, प्राथमिक व माध्यमिक शिक्षक, ग्रामपंचायत कर्मचारी, बँक कर्मचारी, आरोग्य सेविका, अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर, जि.प.व पं.स.सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, लाइनमन, स्वस्त धान्य दुकानदार, रॉकेल दुकानदार, पालक व ग्रामस्थ मोठया संख्येने यामध्ये हातात कोरोना जनजागृतीविषयक फलक घेवून या रॅलीत सहभागी झाल्याचे चित्र होते.
दरम्यान, जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी संजय राठोड यांनी ब्रह्मपुरी येथील जि.प.शाळेच्या प्रभात फेरीत सहभागी होवून कोरोना व मतदार जनजागृती केली. तसेच इ.5 वी ते 8 वी विद्यार्थ्यांच्या शाळा सुरू करण्याच्या सुचना करून पंचसुत्री कार्यक्रमाविषयी मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी माचणूर जि.प.शाळेलाही भेट दिली.
यावेळी शाळेचे वर्ग सॅनिटायझरची फवारणी करून निर्जंतुकीकरण केले का याची पाहणी केली. विद्यार्थी पटसंख्या डिजिटल क्लासरूमचीही पाहणी केली. माध्यमिक प्रशालेत विद्यार्थ्यांचे वर्ग अध्यापनही त्यांनी केले. जि.प.ब्रह्मपुरी व माचणूर जि.प.शाळेचे कामकाज पाहून समाधान व्यक्त केले.
यावेळी प्रभारी गटशिक्षणाधिकारी पोपट लवटे, विस्तार अधिकारी बजरंग पांढरे, केंद्रप्रमुख रामचंद्र पाटील, ब्रह्मपुरीचे सरपंच मनोज पुजारी, उपसरपंच आण्णासोा पाटील, ग्रामसेवक संजय शिंदे, गोरख जगताप, प्रभारी मुख्याध्यापिका सुजाता पुजारी, शिक्षिका सरोजिनी पोतदार, कविराज दत्तू, डोके वस्ती शाळेतील सर्व शिक्षक, शालेय व्यवस्थापन अध्यक्ष व सदस्य, ब्रह्मपुरी शाळेचे मख्याध्यापक सर्व शिक्षक व ग्रामस्थ तसेच माचणूर ग्रामस्थ मोठया संख्येने यावेळी उपस्थित होते.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज