मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी येथे कै.कामण्णा मारुती माळी व कै. ज्ञानोबा शंकर ढगे यांचे स्मरणार्थ अनिलदादा सावंत मित्रपरिवार निंबोणी व एम.डी. स्पोर्ट्स निंबोणी यांच्या वतीने
शनिवार दि.6 मे पासून भैरवनाथ शुगर चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अनिलदादा सावंत मित्रपरिवार निंबोणी यांच्या वतीने देण्यात आली आहे.
शनिवार दि.6 मे रोजी सकाळी 11 वाजता भैरवनाथ शुगरचे व्हाईस चेअरमन अनिल सावंत यांचे हस्ते या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
या क्रिकेट स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस 21111 रु. द्वितीय बक्षीस 11111 रु., तृतीय बक्षीस 7511रु, चतुर्थ बक्षीस 5511 रु. इतके ठेवण्यात आली आहेत.
दरम्यान, बक्षीस वितरण समारंभास भैरवनाथ शुगरचे अनिल सावंत, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सिध्देश्वर आवताडे, भगीरथ भालके उपस्थित राहणार आहेत.
न्यू इंग्लिश स्कूल निंबोणी येथे क्रिकेट स्पर्धा संपन्न होणार आहे. नाव नोंदणीसाठी एम.डी. ढगे 9049330073, नवनाथ ढगे 9503305198, दयानंद ढगे 7350351055 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन अनिलदादा सावंत मित्र मंडळ निंबोणी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत उत्कृष्ट कार्यरत्न पुरस्काराने सन्मानित
भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत यांना उत्कृष्ट कार्यरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. साप्ताहिक रणयुग टाइम्स च्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी देण्यात येणारा उत्कृष्ट कार्यरत्ना हा पुरस्कार यंदा अनिल सावंत यांना जाहीर झाला होता.
या पुरस्काराने सावंत यांना नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे. यावेळी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लेखक, कवी, वात्रटिकाकार भारत सातपुते यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.
यावेळी धनश्री परिवाराचे प्रमुख प्राध्यापक शिवाजीराव काळुंगे, रतनचंद शहा बँकेचे चेअरमन राहुल शहा, दैनिक दामाजी एक्सप्रेसचे संपादक दिगंबर भगरे, समाधान फुगारे, सुलेमान तांबोळी, दिलीप बिनवडे, साप्ताहिक रणयुग टाइम्सचे संपादक प्रमोद बिनवडे हे यावेळी उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज