टीम मंगळवेढा टाईम्स।
सोलापूर जिल्ह्यातील चार वाळू साठ्यांचे लिलाव जिल्हा प्रशासनाने काढले आहेत. त्याची सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. वाळू उपशा करण्यासाठी शिक्षिंदा लाईफस्टाईल आणि प्रतिक इन्फ्राटेक या दोन कंपन्यांना परवानगी देण्यात आली आहे , अशी माहिती अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांनी दिली.
मंगळवेढा तालुक्यातून वाहणाऱ्या भिमा नदीवरील अर्धनारी-बठाण येथील चार वाळू साठ्यांचे लिलाव काढण्यात आले आहेत. त्यातून शासनाला तब्बल ३० कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे.
त्यातून वाळू उपसा सुरु करुन सर्वसामान्य नागरिकांना स्वस्तःत वाळू उपलब्ध करुन देण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने सुरु केली आहे.
साठ्यांच्या ठिकाणी वाहने जाण्या – येण्यासाठी रस्ता तयार करणे, साठ्यांच्या ठिकाणी सीसीटीव्ही लावण्याच्या सुचना जिल्हा प्रशासनाने केल्या आहेत.
आता तेथील तहसिलदार संबंधीत कंपन्यांना वाळू उपसा करण्यासाठी साठ्यांचा ताबा देणार आहेत.
ताबा मिळाल्यानंतर वाळू उपसा सुरु होईल, असे जाधव यांनी सांगितले.
अक्कलकोट तालुक्यातील २ आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील एका वाळू साठ्याचा लिलाव काढण्याची प्रक्रिया सध्या सुरु आहेत. त्यासाठी येत्या १३ एप्रिलला जनसुनावणी बोलाविण्यात आली आहे. लोकांची मते घेऊन शासनाकडे अहवाल पाठविण्यात येईल , असेही त्यांनी स्पष्ट केले .
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज