टीम मंगळवेढा टाईम्स।
चैत्र शुध्द एकादशी २ एप्रिल २०२३ ला असून, यात्रेनिमित्त पंढरपूर शहरात श्री विठ्ठल- रुक्मिणी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात.
वारी कालावधीमध्ये मंदीर परिसरात नारळ विक्री करण्यास व नामदेव पायरी येथे नारळ फोडण्यास मनाई असल्याचा आदेश उपविभागीय अधिकारी गजानन गुरव यांनी जारी केले आहेत.
नारळाची साल मंदीर परिसरात टाकल्याने तसेच नारळ फोडल्याने चिखल होण्याची शक्यता असल्याने घसरंती होऊन कोणत्याही प्रकारची दुर्घटना होऊ नये
यासाठी फौजदारी संहितेच्या कलम १४४ अन्वये १ ते ३ एप्रिल २०२३ या कालावधीत मंदीर व मंदीर परिसरात नारळ फोडण्यास व विक्री करण्यास मनाई आहे.
तसेच शहरातील कायदा व सार्वजनीक सुव्यवस्था राखण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये
१ ते ३ एप्रिल २०२३ या कालावधीत शहरात प्राणी कत्तल यावर बंदी घालण्यात आल्याचे आदेश प्रांताधिकारी गुरव यांनी पारित केले आहेत.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज