टीम मंगळवेढा टाईम्स ।
आपणाला बीड चे पार्सल म्हणून हिणवले तरी आपण शेवटपर्यंत याच तालुक्यात राहणार व याच तालुक्यात मरणार असे भावनिक आवाहन करत आ.राम सातपुते यांनी
येत्या आगामी विधानसभा निवडणुकीत युतीचेच सरकार येणार असल्याची खात्री देत जोमाने कामाला लागण्याचे आवाहन करताना आपण पुन्हा या मतदार संघातून विधानसभा लढवण्यास इच्छुक असल्याचे अप्रत्यक्ष जाहीर केले.
माळशिरस येथील सावता माळी मंगल कार्यालयात आयोजित महायुतीतील घटक पक्षाच्या संकल्प मेळाव्यात ते बोलत होते.
व्यासपीठावर के. के. पाटील, शरद मोरे, राजकुमार हिवरकर, रणजित सूळ, सोपान नारनवर आदी उपस्थित होते.
आमदार सातपुते म्हणाले की, गेल्या निवडणुकीमध्ये आपण केलेली विकास कामे लोकांपर्यंत पोहोचविण्यात कमी पडलो, विरोधकांनी संविधान बदलणार, शेतकऱ्याच्या खतावर जी.एस.टी. लावला आदीचा अपप्रचार केला.
त्याच बरोबर राज्यात सुरु असलेल्या आंदोलनाचा परिणाम झाला. त्यामुळे पराभव झाला. मी तालुक्याचा सालगडी म्हणून काम केले.
यापुढेही काम करत राहणार आहे. मी मेल्यानंतर ही माझे अंत्यसंस्कार इथल्या मातीत होतील, असे भावनिक वक्तव्य आमदार राम सातपुते यांनी यावेळी केले.
रणजितसिंह मोहिते पाटलांनी राजीनामा द्यावा
माळशिरस तालुक्यात एक लाख ऐंशी हजाराचे लीड मिळेलच्या घोषणा केल्या. पण नुसत्या ८० हजाराचे ही लीड मिळाले नाही. भाजपला २५ हजार मते मिळणार नाहीत म्हणाले त्याठिकाणी भाजपने ६५ हजार मते मिळवली असा
घणाघात मोहिते पाटील यांचे नाव न घेता आ. सातपुते यांनी केला. यावेळी आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी महायुतीचे कामन केल्याने आमदारकीचा राजीनामा द्यावा, असा ठराव भाजप नेते के. के. पाटील यांनी मांडला.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज