टीम मंगळवेढा टाईम्स ।
उजनी धरण आता ८० टक्क्यांवर स्थिरावले असून , एकूण जलसाठा १०७ टीएमसी झाला असून , धरण १०० % भरण्यासाठी आता केवळ १० टीएमसी पाण्याची गरज आहे.धरणातील उपयुक्त जलसाठा ही ४३ टीएमसी झाला आहे.
दौंड येथून उजनी धरणात येणारा विसर्ग आता पूर्णपणे मंदावला असून, तो २७१७ क्युसेकपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे आता धरणाच्या पाणी पातळीत होणारी वाढही थांबली आहे.
असे असले तरी मागील पाच – सहा वर्षांच्या तुलनेत चालू पावसाळ्यात धरणात समाधानकारक पाणीसाठा झाला आहे.
पावसाळा आणखी दोन महिने बाकी असल्याने या काळात पडणाऱ्या पावसाच्या पाण्यावर धरण १०० % भरेल याची शेतकऱ्यांना शंभर टक्के खात्री झाल्याने आनंदाचे वातावरण आहे.
दि . ३ ऑगस्ट रोजी मागील सहा वर्षांत धरणाची असलेली टक्केवारी पुढीलप्रमाणे होती.
सन २०२१ ( ५५ % ) , सन २०२० ( १२.१४ % ) , सन २०१ ९ ( ३३ % ) , सन २०१८ ( ३४.५४ % ) , सन २०१७ ( ५०.४४ % ) , तर सन २०१६ साली उजनी धरण मायनस २७.७५ % झाले होते. मागील वर्षीच्या तुलनेतही चालू वर्षी धरणात २५ टक्के जादा पाणी आहे.
उजनी धरणातील पाणीसाठ्यावरच मंगळवेढा, माढा , करमाळा पंढरपूर , माळशिरस , मोहोळ या तालुक्यांसह जिल्ह्यातील इतर तालुक्यांतील बागायती क्षेत्र विशेष करून ऊस व केळी या पिकाचे भवितव्य अवलंबून आहे.
पर्यायाने जिल्ह्यातील साखर कारखानदारीचे भविष्यही उजनी धरणावरच असल्याने संपूर्ण जिल्ह्याचेच लक्ष उजनीच्या पाण्यासाठी लागलेले असते.
आऊट फ्लो सीनामाढा उपसा २५९ क्युसेक दहिगाव उपसा ६८ क्युसेक बोगदा २०० क्युसेक
धरणाची सद्य : स्थिती एकूण पाणी पातळी ४९५.९०० मीटर एकूण जलसाठा १०६.६३.टीएमसी. उपयुक्त जलसाठा ४२.९ ८ टीएमसी . टक्केवारी ८०.२२ इन फ्लो बंडगार्डन ३८१ ९ क्युसेक दौंड २७१७ क्युसेक.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज