mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

ऑनलाइन नोंदणी सुरु! आता शेतकरी शेतमाल हमीभावाने विक्री करु शकतील; हरभऱ्यासाठी मंगळवेढ्यात ‘हे’ खरेदी केंद्रे

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
February 18, 2021
in सोलापूर, मंगळवेढा
वायरमनला अतिरिक्त कामाचा बोजा; वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे मंगळवेढा महावितरणचे कर्मचारी असुरक्षित

टीम मंगळवेढा टाईम्स। 

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून हमीभावाने हरभरा खरेदी करण्यासाठी नाफेडतर्फे आजपासून नऊ खरेदी केंद्रे सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सोलापुरातील केंद्रावर उत्तर व दक्षिण सोलापुरातील शेतकऱ्यांचा हरभरा, कुर्डूवाडीच्या केंद्रावर माढ्यातील शेतकरी, मंगळवेढ्यातील केंद्रावर पंढरपूर व मंगळेवढ्यातील शेतकरी, करमाळ्यातील केंद्रावर करमाळा व माळशिरस येथील शेतकरी, अनगर केंद्रावर मोहोळ तालुक्‍यातील शेतकरी

तर मरवडे येथील केंद्रावर मंगळवेढा व सांगोल्यातील शेतकरी शेतमाल हमीभावाने विक्री करु शकतील, अशी माहिती जिल्हा पणन अधिकारी भास्कर वाडीकर यांनी दिली.

शेतकऱ्यांनी नाव नोंदणी केल्यानंतर त्यांच्या मोबाईलवर एसएमएस पाठविला जाणार आहे. त्या दिवशी त्यांनी स्वच्छ व वाळलेला चणा विक्रीसाठी हमीभाव केंद्रावर आणावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

सध्या बाजारात हरभऱ्याला प्रति क्‍विंटल चार हजार 500 रुपयांपर्यंत दर आहे. तरीही यंदा जिल्हाभरातून 70 हजार क्‍विंटल हरभरा हमीभाव केंद्रावर खरेदी होऊ शकतो, असा अंदाज मार्केटिंग फेडरेशनने वर्तविला आहे.

शेतकऱ्यांसाठी सध्या ऑनलाइन नोंदणी सुरु झाली असून वेळेत त्यांनी नोंदणी करुन घ्यावी. जेणेकरुन त्यांना प्रति क्‍विंटल 5 हजार 100 रुपयांचा हमीभाव मिळेल, असेही वाडीकर यांनी स्पष्ट केले आहे.

सोलापूर जिल्ह्यात ‘हे’ खरेदी केंद्रे

तालुका खरेदी-विक्री संघ, मंगळवेढा,संत दामाजी शेती व साधन पुरवठा सहकारी संस्था, मंगळवेढा,भाळवणी कृषी फामर्स प्रोड्यूसर कंपनी (मरवडे), संत दामाजी शेती व साधन पुरवठा सहकारी संस्था, मंगळवेढा , विकास सेवा सोसायटी, दुधनी (अक्‍कलकोट), तुळजाभवानी कृषी व साधन पुरवठा सहकारी संस्था, उंबरगे (बार्शी), कृषी उत्पन्न बाजार समिती, कुर्डूवाडी,  विठ्ठल सर्वसाधारण सहकारी संस्था, मांगी (करमाळा) आणि  विकास सेवा सहकारी सोसायटी (अनगर) या ठिकाणी हरभरा खरेदी केली जाणार आहे.

मंगळवेढा तालुका सहकारी कृषि उद्योग संघ  याच्यावतीने हमीभाव हरभरा खरेदी केंद्रांच्या ऑनलाईन नावनोंदणीस आजपासून सुरुवात : चेअरमन बबनराव आवताडे

मंगळवेढा तालुका सहकारी कृषि उद्योग  संघ, नाफेड  व महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने दि.१८ फेब्रुवारी २०२१ पासुन हमीभाव हरभरा खरेदी केंद्राच्या ऑनलाईन नावनोंदणीची मंगळवेढा तालुका सहकारी कृषि उद्योग संघाच्या कार्यालयामध्ये सुरवात सकाळी ११ वाजता होणार असल्याची माहिती चेअरमन बबनराव आवताडे यांनी दिली.

या खरेदी केंद्रामुळे मंगळवेढा तालुक्यासह व इतर तालुक्यातील सर्व हरभरा उत्पादक शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी मंगळवेढा तालुका सहकारी कृषि उद्योग संघ कार्यालयाच्या विभागाकडून एसएमएस प्राप्त झाल्यानंतर शेतक-यांनी हरभरा विक्रीसाठी हमीभाव केंद्रावर आणायचा आहे.

त्यानंतर विक्री केलेल्या हरभरा या पिकाची रक्कम ऑनलाईन शेतक-यानी दिलेल्या बँक खात्यावर जमा होणार आहे चालुवर्षी हरभरा या धान्यासाठी आधारभूत किंमत ५१०० /- रुपये आहे.

नावनोंदणी साठी सन २०२०-२०२१ च्या  हरभरा या पिकाची नोंद असलेला ७/१२ उतारा  आधार कार्ड झेरॉक्स  बँक पासबुकची स्पष्ट  दिसत असणारे  झेरॉक्स व मोबाईल नंबर ची आवश्यकता आहे.

खरेदी केंद्रांच्या अधिक माहिती साठी कृषि उद्योग सहकारी संघाचे व्यवस्थापक हणमंतराव मासाळ ९६६५७४१९६० शंभुमामा नागणे मो नं ९४०५२१४५९५, मच्छिंद्र कोंडुभैरी ९८९०८३१९३४ (९०२८५०९७७७) यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: खरेदीमंगळवेढाहरभरा

संबंधित बातम्या

सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

October 6, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

प्राणघातक हल्ला! मंगळवेढ्यात शेतजमिनीच्या वादातून महिलेला दगडाने बेदम मारहाण; एकाच कुटुंबातील चौघांवर गुन्हा दाखल

October 6, 2026
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी उपसरपंच बालाजी गरड यांची आक्रमक भूमिका; सर्व शेतकऱ्यांना विनाविलंब आर्थिक मदत व दुष्काळ निधी देण्याची मागणी

October 6, 2026
मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

October 5, 2026
सबजेल हाऊसफुल्ल पंढरपूरचे कैदी मंगळवेढ्यात वर्ग; कोरोना संसर्गाची कैद्यांना भीती

मोठी बातमी! ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळीला अटक; एक वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध, नेमकं कारण काय?

October 5, 2026
मागेल त्याला टँकर! शेतातील नुकसानीचे पंचनामे तात्काळ करा; एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये: आमदार समाधान आवताडे यांच्या अधिकाऱ्यांना कडक सूचना

मागेल त्याला टँकर! शेतातील नुकसानीचे पंचनामे तात्काळ करा; एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये: आमदार समाधान आवताडे यांच्या अधिकाऱ्यांना कडक सूचना

October 4, 2026

ई-पीक पाहणीसाठी शेतकऱ्याकडे ५०० रुपयांची खंडणी; साहाय्यकाची हकालपट्टी करत पोलिसांत गुन्हा दाखल; ​दुष्काळी अनुदानाची भीती दाखवून पैशांची मागणी

October 4, 2026
मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे! मंगळवेढ्यात घोषणाबाजीसह शांततेच्या मार्गाने शहर व तालुका कडकडीत बंद; उपोषणाला शहर अन् तालुक्यातून प्रचंड पाठिंबा

खोट्या अट्रोसिटीच्या विरोधात मंगळवेढा शहर कडकडीत राहिले बंद; आमदार समाधान आवताडे यांच्या आश्वासनानंतर आंदोलन घेतले मागे

October 4, 2026
वाळू माफियांची मुजोरी तहसिलदारांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

मंगळवेढ्यात संतापाची लाट! आजपासून तालुका बेमुदत बंद; खोटे ॲट्रॉसिटी गुन्हे मागे घेण्यासह १२ आरोपींच्या तात्काळ अटकेची जोरदार मागणी; संपूर्ण जिल्ह्याचे लागले लक्ष

October 3, 2026
Next Post
मंगळवेढेकरांनो सावधान! शहरातून दोन दुचाकी चोरीला; वाहन चोरांचे पोलिसांना आव्हान

मंगळवेढा ब्रेकिंग! 'या' गावात एकाच रात्री अर्धा डझन चोऱ्या; चोरट्यांनी पोलिसांना दिले आव्हान

ताज्या बातम्या

सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

October 6, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

नागरिकांनो! ग्रामपंचायतीला किती निधी आला, कुठे खर्च झाला? आता मोबाईलवरच पाहता येणार सगळा हिशेब

October 6, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

प्राणघातक हल्ला! मंगळवेढ्यात शेतजमिनीच्या वादातून महिलेला दगडाने बेदम मारहाण; एकाच कुटुंबातील चौघांवर गुन्हा दाखल

October 6, 2026
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी उपसरपंच बालाजी गरड यांची आक्रमक भूमिका; सर्व शेतकऱ्यांना विनाविलंब आर्थिक मदत व दुष्काळ निधी देण्याची मागणी

October 6, 2026
मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

October 5, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

सावकारांनो सावधान! शेतकऱ्यांना अडचणीत आणाल तर थेट…. मंत्री बावनकुळेंचा इशारा, पोलिसांना सूचना, बँकांनांही दिली ताकीद

October 5, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..