मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
डी एम के जी काॅलेज ऑफ फार्मसी मंगळवेढा महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता सुविधा केंद्र FC center 16109 ची ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुविधा उपलब्ध असुन या ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रियेला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्तपणे प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याची माहिती प्राचार्य डाॅ. राहुल जाधव यांनी दिली.
डीएमकेजी काॅलेज ऑफ फार्मसी मध्ये बी फार्मसी प्रवेश प्रक्रिया हि दि. ७ जुलै २०२५ पासून सुरू झाली असून हि ऑनलाइन रजिस्ट्रेशन प्रवेश प्रक्रिया १४ जुलै २०२५ पर्यंत चालणार आहे.
याशिवाय डीएमकेजी काॅलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयात थेट द्वितीय वर्ष बी फार्मसी रजिस्ट्रेशन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून डी फार्मसी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना थेट द्वितीय वर्ष बी फार्मसी पदवी प्रवेशकरिता ऑनलाईन अर्ज दि. ४ जुलै २०२५ पासून सुरुवात झाली असुन हि प्रक्रिया १६ जुलै २०२५ पर्यत चालणार आहे.
डीएमकेजी काॅलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयातील एफ सी सेंटरवर विद्यार्थी व पालकांनी प्रचंड गर्दी केल्याचे चित्र दिसून आले. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण दिले जात असल्याने अनेक विद्यार्थ्यांचा सर्वाधिक ओढ डीएमकेजी काॅलेज कडे असल्याचे दिसून येते.
प्राचार्य डाॅ. राहुल जाधव यांच्या नेतृत्वाखालील उच्च शिक्षित प्राध्यापक अभ्यासपूर्ण मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करत आहेत. कॉलेज मध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणेसाठी तसेच विद्यार्थ्यांना अचूक अर्ज भरण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली आहे.
हि समिती नियोजनबद्धपणे रजिस्ट्रेशन प्रक्रिया पार पाडत आहेत. या प्रक्रियेला विद्यार्थी व पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला आहे.
महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष देऊन त्यांचा गुणात्मक दर्जा उंचावण्याचे काम डीएमकेजी काॅलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयातील शिक्षक करीत आहे.
तणाव विरहित शिक्षण पद्धती विद्यार्थ्यांना डीएमकेजी मध्ये मिळत असल्याने विद्यार्थी व पालकांचा सर्वाधिक ओढा डीएमकेजी काॅलेज कडे असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज