टीम मंगळवेढा टाईम्स।
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात होणाऱ्या देवाच्या पूजेची संधी राज्यातील गोरगरीब भाविकांनाही उपलब्ध व्हावी, पूजा बुकिंग प्रक्रियेत पारदर्शकता असावी, यासाठी मंदिर समितीकडून सप्टेंबरअखेर ऑनलाइन पूजा बुकिंग सेवा सुरू करण्यात येणार आहे.
यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातील भाविकाला घरबसल्या देवाची पूजा बुकिंग करता येणार असल्याची माहिती समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
दररोज विठ्ठलाच्या दोन व रुक्मिणीच्या दोन नित्यपूजा व १० पाद्यपूजा असतात. त्याचबरोबर नैवेद्य, पोशाख व धुपारती अशा तीनवेळी १५ प्रमाणे एका दिवसात ४५ तुळशी पूजा होतात.
या पूजा बुकिंग करण्यासाठी १ तारखेला भाविकांना मंदिरात येऊन पहाटेपासूनच रांगेत थांबावे लागते.
यादरम्यान एकच व्यक्ती काही वेळा जादा पूजा बुकिंग करत असतात. यामुळे इतर भाविकांना संधी मिळत नाहीत. पूजा बुकिंगसाठी राज्यातून भाविकांना मंदिरात येणे शक्य नाही.
एकाच व्यक्तीला देवाच्या जास्त पूजा न मिळता त्या इतर भाविकांनाही उपलब्ध व्हाव्यात. विठ्ठलाच्या पूजा बुकिंग व्यवस्थेत पारदर्शकता यावी. यासाठी मंदिर समितीकडून संगणक प्रणाली विकसित करण्यात येणार आहे.
त्याचबरोबर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या मोबाइल लॉकरमध्ये मोबाइल ठेवल्यास भाविकांना सध्या हस्तलिखित पावती मिळते.
परंतु संगणक प्रणाली सुरू झाल्यास भाविकांना त्यांच्या मोबाइल लॉकरमध्ये ठेवल्यास त्यांच्या मोबाइल नंबर, नाव व गावाची माहितीसह, कॉम्प्युटर पावती दिली जाणार आहे. या संगणक प्रणालीमुळे भाविकांना सोयीस्कर वाटणार आहे.
■ संगणक प्रणालीद्वारे तीन किंवा सहा महिन्याच्या पूजेचे बुकिंग एकाचवेळी होणार आहे. त्यासाठी १५ दिवस अगोदर ऑनलाइन व्यवस्थेबाबत प्रसिद्धी करून माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
देणगीची मोबाइलवर मिळणार पावती
विठ्ठलाला भाविकांनी क्यू-आर कोडच्या माध्यमातून ऑनलाइन देणगी दिल्यास भाविकांना त्याचवेळी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीची देणगी पावती मिळणार असल्याची माहिती समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज