टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुका सहकारी खरेदी विक्री संघ, नाफेड महाराष्ट्र, राज्य मार्केटिंग फेडरेशन सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने आज दि.२ मार्च २०२३ पासून
हमीभाव हरभरा खरेदी केंद्राच्या ऑनलाइन नाव नोंदणीची मंगळवेढा तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या कार्यालयामध्ये सुरुवात आज सकाळी ११ वाजता होणार असल्याची माहिती चेअरमन सिद्धेश्वर आवताडे यांनी दिली.
नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी मंगळवेढा तालुका सहकारी खरेदी विक्री संघ कार्यालयाच्या विभागाकडून SMS प्राप्त झाल्यानंतर शेतकऱ्यांनी हरभरा विक्रीसाठी हमीभाव खरेदी केंद्रावर आणायचा आहे.
हरभऱ्यासाठी आधारभूत किंमत ५ हजार ३३५ रुपये
त्यानंतर विक्री केलेल्या हरभऱ्याची रक्कम ऑनलाइन शेतकऱ्यांनी दिलेल्या बँक खात्यावर जमा होणार आहे. चालूवर्षी हरभरा या धान्यासाठी आधारभूत किंमत ५ हजार ३३५ रुपये आहे.
‘ही’ कागदपत्रे आवश्यक
नोंदणीसाठी सन २०२२-२३ च्या हरभरा या पिकाची नोंद असलेला सातबारा उतारा आधार कार्ड झेरॉक्स बँक पासबुकची स्पष्ट दिसत असणारे झेरॉक्स व मोबाईल नंबरची आवश्यकता आहे.
खरेदी केंद्राच्या अधिक माहितीसाठी खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक शंभू नागणे 9405 214 595 ,मच्छिंद्र कोंडूभैरी 9890831934 यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज