टीम मंगळवेढा टाईम्स ।
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा आजपासून दि.6 ते 23 मे 2021 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने होत असून विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाकडून हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली. pahsu.org या पोर्टलवरून विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार आहे.
डॉ. फडणवीस म्हणाल्या, कोरोनामुळे राज्यात संचारबंदी सुरू आहे. त्याअंतर्गत शासनाने विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी विद्यापीठ परीक्षा विभागाकडून ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
त्यानुसार बीए, बीकॉम, बीएस्सी भाग एक आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्राच्या परीक्षा सुरू होणार आहेत.याबाबत परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. विकास कदम म्हणाले, विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये.
अगदी सोप्या पद्धतीने ऑनलाइन परीक्षा देता येईल अशी सोय विद्यापीठ परीक्षा विभागाकडून केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना अँड्रॉईड मोबाईल, लॅपटॉप, संगणकावरून ऑनलाईन परीक्षा देता येईल.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी व्हिडिओ आणि हेल्पलाईन क्रमांक
तांत्रिक अडचणीसाठी हेल्पलाईन क्रमांक
अमित- 8010093831, शुभम- 8010076657, अफजल- 8010083760, विनायक- 8010085759.
परीक्षेसंदर्भात हेल्पलाइन क्रमांक
मोटे- 8421905623, लटके- 8421238466, आवटे- 8421638556, गंगदे- 8421068436, गावडे- 8421528436, बाबरे- 8421478451.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज