टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहरातील बोराळे नाक्यावर रस्ता ओलांडताना एका ६८ वर्षीय वृध्द महिलेस शहरात येणाऱ्या ट्रकने जोराची धडक दिल्याने उजव्या हाताचे पुर्णपणे मांस निघून हात व उजव्या पायाचा गुडघा फॅक्चर केल्याप्रकरणी सोलापुरातील रुग्णालयात उपचार सुरू होते.
अखेर वत्सला सिध्देश्वर बोमणा (वय ६८) या वृध्द महिलेची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली असून उपचारादरम्यान रात्री 12.30 वाजता मृत्यू झाला.
या घटनेची हकीकत अशी, यातील मयत महिला वत्सला सिध्देश्वर बोमणा ही वृध्द महिला मंगळवेढयातून नंदेश्वर येथे दि.४ रोजी सायंकाळी ७.३० वाजता नंदेश्वर येथे बाळूमामाची आरती असल्याने त्या दर्शनासाठी गेल्या होत्या.
दर्शन घेवून त्या जखमी आजी पुन्हा रात्री १० वाजता खाजगी वाहनातून बोराळे नाक्यावर उतरुन घराकडे जात असताना मरवडे रस्त्यावरील महिला हॉस्पिटलच्या बाजूने एका भरधाव ट्रकने वेगाने येवून रस्ता ओलांडणाऱ्या वृध्देस जोराची धडक दिल्याने ती वृध्दा जखमी होवून गंभीर अवस्थेत खाली पडली.
या दुर्घटनेत त्या वृध्देचे मांस निघून हात मोडले व उजव्या पायाच्या गुडघ्या पासून मांस निघून पायाचे हाड मोडल्याचे मुलगा जगन्नाथ बोमण्णा यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले होते.
ट्रक क्र.एम. एच.४३ बी.एक्स ९३९७ च्या अज्ञात ट्रक चालकाविरुध्द निष्काळजीपणे वाहन चालवून जखमी केल्याप्रकरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, मंगळवेढा शहरात अवजड वाहनांची रात्रंदिवस रीघ असते. शहराच्या बायपास ब्रीज जवळ मरवडे मार्गावर तर घाडगे न कलेक्शन जवळील पंढरपूर मार्गावरील बायपास रस्त्याजवळ शहरात अवजड वाहने येवू नये म्हणून हजारो रुपये खर्चुन दोन कमानी बसविण्यात आल्या आहेत.
यापुर्वी अपघात होवून जवळपास सहा ते सात व्यक्तींचा जीव गेला आहे. वाहनांना शहरात प्रवेश बंदीसाठी नागरिकांनी वेळोवेळी आंदोलनेही केली.
मात्र या घटनेकडे प्रशासनाचे गांभीर्यपुर्वक दुर्लक्ष होत असल्याने अशा घटना सातत्याने घडत असल्याच्या या अपघातानंतर नागरिकांमधून सुर उमटत आहे. मनसेचे नारायण गोवे यांनी आंदोलन करण्याचे इशारे देवूनही त्याकडे कानाडोळा केल्याचे या घटनेवरुन स्पष्ट होत आहे.
अजून किती जणांचा बळी घेतल्यानंतर ही वाहतूक बंद होणार आहे असा संतापजनक सवाल या घटनेवरुन शहरात सुज्ञ नागरिकामधून विचारला जात होता. येत्या दोन दिवसात अवजड वाहतूक पुर्ण बंद न झाल्यास नागरिकांनी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज