मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
एटीएमची अदलाबदली करून खात्यातील १ लाख ४५ हजार काढून फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
लक्ष्मी टाकळी (ता. पंढरपूर) येथील एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या वृद्धाच्या एटीएमची अदलाबदली करून खात्यातील एक लाख ४५ हजार काढून फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
मित्राने उसने पैसे मागितल्यानंतर १ लाख ४५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले आहे. याबाबत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, धोंडीराम भानुदास माने ( वय ६१, रा. लक्ष्मी टाकळी, ता. पंढरपूर) यांचे व त्यांच्या पत्नी गोकुळा यांचे भारतीय स्टेट बँकेच्या पंढरपूर शाखेत जॉईंट खाते आहे.
१२ जुलै २०२३ रोजी त्यांनी भारतीय स्टेट बँकेच्या पंढरपूर शाखेच्या एटीएममध्ये जाऊन तेथे असलेल्या पाठीमागील इसमाकडून १० हजार रुपये काढून घेतले.
त्यादरम्यान या इसमाने माने यांचे एटीएम स्वत:कडे ठेवून दुसरे एटीएम त्यांना दिले. ते एटीएम कार्ड न पाहता माने यांनी स्वत:कडे ठेवले.
त्यानंतर १८ जुलै २०२३ रोजी चेकने ६० हजार रुपये बँकेतून काढले. त्यानंतर २१ जुलै २०१३ रोजी त्यांच्या मित्राने त्याला उसने पैसे मागितले. त्यामुळे माने मित्रासह बँकेत एटीएममध्ये गेले. तेव्हा पैसे न निघाल्याने एटीएम कार्ड बदलल्याचे मानेंच्या लक्ष्यात आले.
त्यानंतर त्यांनी बँकेत जाऊन खात्री केली, बँक स्टेटमेंट घेतले, त्यावेळी १२ जुलै २०२३ ते १९ जुलै २०२३ यादरम्यान १ लाख ४५ हजार रुपये खात्यातून काढून फसवणूक झाली असल्याचे समजले. याबाबत त्यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज