मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
पुणे मेट्रोच्या उद्घाटनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 1 ऑगस्ट रोजी पुणे दौरा करणार आहेत. यावेळी टिळक पुरस्काराच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार एकाच मंचावर येणार आहेत.
मात्र, शरद पवार या सोहळ्याला हजेरी लावणार असल्यामुळे महाविकासआघाडीमध्ये अस्वस्थता परसली आहे. मोदींच्या पुरस्कार सोहळ्याला जाणारच अशी भमिका शरद पवार यांची आहे.
संजय राऊत म्हणातात संभ्रम निर्माण होईल
शरद पवार यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहू नये यासाठी महाविकासआघाडीचे नेते आग्रही असल्याचे समजते. मात्र, शरद पवार हे कार्यक्रमाला उपस्थिती लावण्यावर ठाम आहेत. त्यामुळे मविआत तीव्र नाराजी असल्याची चर्चा आहे.
पवारांनी उपस्थिती लावू नये अशी उघड भूमिका ठाकरे गटानं घेतली आहे. शरद पवार यांनी मोदींच्या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावल्यास संभ्रम निर्माण होईल असं वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे.
मोदींच्या पुरस्कार सोहळ्याला जाऊ नये म्हणून शरद पवारांवर दबाव
मोदींच्या पुरस्कार गौरव कार्यक्रमाला जाऊ नये म्हणून शरद पवारांवर दबाव वाढत आहे. बाबा आढावांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ पवारांना भेटणार होते. या शिष्टमंडळात काँग्रेस, आप, ठाकरे, पवार गटाचे नेते होते.
पुण्यातील पवारांच्या मोदीबागेतील घरी हे शिष्टमंडळ भेटणार होते. शिष्टमंडळ पवारांना भेटून कार्यक्रमास न जाण्याची विनंती करणार होते. मात्र, शरद पवार हे कार्यक्रमाला जाण्यावर टाम असल्यामुळे ही भेट बाबा आडाव यांनी रद्द केली आहे.
पंतप्रधान मोदी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचे 41 वे मानकरी
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुणे दौ-यावर आहेत. मोदींना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी म्हणजे 1 ऑगस्टला दरवर्षी हा पुरस्कार प्रदान केला जातो.
पंतप्रधान मोदी या पुरस्काराचे 41 वे मानकरी आहे. पुरस्कार सोहळ्यानंतर पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील विविध विकास प्रकल्पांचं उदघाटन आणि पायाभरणी पंतप्रधान मोदी करणार आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज