mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

कै.सोजरबाई दत्तू यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त युवा किर्तनकार शिवलीला पाटील यांचे आज मंगळवेढ्यात किर्तन

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
July 23, 2024
in मंगळवेढा, मनोरंजन
कै.सोजरबाई दत्तू यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त युवा किर्तनकार शिवलीला पाटील यांचे आज मंगळवेढ्यात किर्तन

टीम मंगळवेढा टाईम्स। 

कै. सौ. सोजरबाई सुकदेव दत्तू यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आज मंगळवार दि.२३ जुलै रोजी सकाळी ९.३० वाजता प्रमुख मान्यवरांच्या हस्ते कै.दत्तू यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात येणार आहे.

सकाळी १० वाजता कारखाना रोड वरील किशोर दत्तू मळा येथे युवा किर्तनकार ह.भ.प. शिवलीला पाटील यांचे किर्तन आयोजित करण्यात आले असल्याची माहिती किशोर दत्तू यांनी दिली.

या किर्तनासाठी पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी अध्यात्मिक बाल वारकरी संस्थेचे ह.भ.प. नितीन आदमाने व बालवारकरी यांची साथसंगत लाभणार आहे.

किशोर दत्तू मळा कारखाना रोड येथे सर्वांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन दत्तू परिवाराच्यावतीने करण्यात आले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवणार : अजित पवार

लोकसभा निवडणुकीत महायुतीमधील सत्ताधारी तिन्ही पक्ष एकत्र लढलो. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवायच्या आहेत. त्यामुळे महापालिका, नगरपालिका,

जिल्हा परिषद, तालुका पंचायत्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या ठिकाणी कामे व्यवस्थित करा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

गुरुपौर्णिमेनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पुणे शहर विधानसभा अध्यक्ष, माजी नगरसेवक सर्व सेल कार्यकारिणी पदाधिकारी मेळावा केसरी वाडा येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते मार्गदर्शनपर बोलत होते.

यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शक्य तिथे स्वबळावर लढवणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केले. पुणे-कल्याणीनगर अपघात प्रकरणात पुण्याचे वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे यांची तीन-चार वेळा चौकशी झाली; पण त्यातून काही समोर आले नाही.

त्यामुळे उगाच बदनामी केली जाते. लोकप्रतिनिधी म्हणून मदत करायला लोक फोन करतात तर जावे लागते. माध्यमांपासून सावध राहा. पुण्याला बदनामी करणाऱ्या घटना मधल्या काळात घडल्या. त्या सर्वांवर कारवाई केली आहे.

अतिक्रमण करून कोण धंदे करणार असेल, तर चालणार नाही. नियमावलीत भेदभाव नाही. सर्वांना सारखाच न्याय देत आहोत. त्यामुळे बदनामी करू नये. असे कृत्य खपवून घेतले जाणार नाही, असे अजित पवार म्हणाले.

लोकसभेत विरोधकांनी ‘४०० ‘पार झाल्यावर संविधान बदलले जाणार आहे, असा चुकीचा नरेटिव्ह सेट केला. यामुळे एससी, एसटी आदिवासी समाज यांना भीती वाटू लागली. त्यामुळे लोकसभेला फटका बसला. सूर्य-चंद्र आहे तोवर संविधान बदलता येणार नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

संबंधित बातम्या

​सहकार आणि समाजकारणाचा सुवर्णसंगम म्हणजे स्व.सुभाष शहा; आमदार समाधान आवताडे यांनी जागवल्या आठवणी

​सहकार आणि समाजकारणाचा सुवर्णसंगम म्हणजे स्व.सुभाष शहा; आमदार समाधान आवताडे यांनी जागवल्या आठवणी

February 19, 2026
मनोहर (आप्पा) रोकडे नागरी बिगरशेती पतसंस्थेचा आज मंगळवेढ्यात लोकपर्ण सोहळा; सर्व बँकिंग सुविधा आता एकाच छताखाली

मनोहर (आप्पा) रोकडे नागरी बिगरशेती पतसंस्थेचा आज मंगळवेढ्यात लोकपर्ण सोहळा; सर्व बँकिंग सुविधा आता एकाच छताखाली

February 19, 2026
घाम फोडला! रोमांचक मॅचमध्ये टीम इंडियाचा धमाकेदार विजय; पाकिस्तानला मोठा धक्का

भारताच्या मार्गातील ‘मोठा’ अडथळा दूर झाला! Super 8s मध्ये आता लिंबूटींबू संघ दिसणार;  वेळापत्रक फिक्स, पहिलाच सामना हायव्होल्टेज, कुणाचं आव्हान?

February 18, 2026
​स्मृतीवंदन! स्व.सुभाषराव शहा यांच्या स्मृतींना ‘सेवाकार्याने’ अभिवादन; १४ व्या पुण्यस्मरणानिमित्त विविध उपक्रम

​स्मृतीवंदन! स्व.सुभाषराव शहा यांच्या स्मृतींना ‘सेवाकार्याने’ अभिवादन; १४ व्या पुण्यस्मरणानिमित्त विविध उपक्रम

February 18, 2026
खुशखबर! ‘हॉटेल महालोक’ फॅमिली रेस्टॉरंटचा आज मंगळवेढ्यात दिमाखदार शुभारंभ; एकनाथ शिंदे, मंत्री गोगावले, सोमवरनाथ महाराज, अलका कुबल या दिग्गजांच्या उपस्थितीत रंगणार सोहळा

खुशखबर! ‘हॉटेल महालोक’ फॅमिली रेस्टॉरंटचा आज मंगळवेढ्यात दिमाखदार शुभारंभ; एकनाथ शिंदे, मंत्री गोगावले, सोमवरनाथ महाराज, अलका कुबल या दिग्गजांच्या उपस्थितीत रंगणार सोहळा

February 18, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

पंचायत समिती नंतर जिल्हा परिषदेच्या निवडी; नव्या सदस्यांचे गॅझेट झाले प्रसिद्ध; निवडणूक कार्यक्रम होणार लवकरच जाहीर;..अशी असेल पुढची प्रक्रिया…

February 17, 2026
समस्त मंगळवेढेकरांची भावना! शिवतीर्थावरील ‘टाऊन हॉल’ला ‘छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन’ नाव द्या; शिवजयंती उत्सव मंडळाची आग्रही मागणी

समस्त मंगळवेढेकरांची भावना! शिवतीर्थावरील ‘टाऊन हॉल’ला ‘छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन’ नाव द्या; शिवजयंती उत्सव मंडळाची आग्रही मागणी

February 16, 2026
भीमेचा श्वास गुदमरतोय! वाळू उपशाच्या हव्यासामुळे भीमेचं अस्तित्व धोक्यात; पर्यावरणाचा समतोल कोलमडला; वाळू माफियांच्या ‘ड्रेझर’ खाली नदीचं पात्र छिन्नविच्छिन्न; भविष्यात पाणीटंचाईचे संकेत

पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

काय सांगताय..! बायकोने दीड कोटींना नवरा विकला, गर्लफ्रेंडने पैसे मोजताच दिला ‘हँडओव्हर’; ‘जुदाई’च्या रियल लाइफ स्टोरीची गावभर चर्चा

February 15, 2026
Next Post
मोदी सरकारची दसरा-दिवाळीआधीच भेट! LTC आणि 10 हजार रुपये फेस्टिवल अ‍ॅडव्हान्स

मोदी 3.0 सरकारच्या पहिल्याच अर्थसंकल्पात मोठ्या घोषणांचा पाऊस? शेती, रोजगारावर भर, तर आयकरातून सूट

ताज्या बातम्या

​सहकार आणि समाजकारणाचा सुवर्णसंगम म्हणजे स्व.सुभाष शहा; आमदार समाधान आवताडे यांनी जागवल्या आठवणी

​सहकार आणि समाजकारणाचा सुवर्णसंगम म्हणजे स्व.सुभाष शहा; आमदार समाधान आवताडे यांनी जागवल्या आठवणी

February 19, 2026
मनोहर (आप्पा) रोकडे नागरी बिगरशेती पतसंस्थेचा आज मंगळवेढ्यात लोकपर्ण सोहळा; सर्व बँकिंग सुविधा आता एकाच छताखाली

मनोहर (आप्पा) रोकडे नागरी बिगरशेती पतसंस्थेचा आज मंगळवेढ्यात लोकपर्ण सोहळा; सर्व बँकिंग सुविधा आता एकाच छताखाली

February 19, 2026
घाम फोडला! रोमांचक मॅचमध्ये टीम इंडियाचा धमाकेदार विजय; पाकिस्तानला मोठा धक्का

भारताच्या मार्गातील ‘मोठा’ अडथळा दूर झाला! Super 8s मध्ये आता लिंबूटींबू संघ दिसणार;  वेळापत्रक फिक्स, पहिलाच सामना हायव्होल्टेज, कुणाचं आव्हान?

February 18, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

जिल्हा नियोजनाचा ‘रिमोट कंट्रोल’ कोणाकडे? ४० जागांसाठी ‘या’ महिन्यात निवडणूक; गुडघ्याला बाशिंग बांधून नेते तयार; पालकमंत्र्यांकडे आतापासून फिल्डिंग

February 18, 2026
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

मोठी बातमी! राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले; सोलापूर जिल्ह्यातील ७५८ ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेला ‘या’ तारखेपासून सुरुवात

February 18, 2026
​स्मृतीवंदन! स्व.सुभाषराव शहा यांच्या स्मृतींना ‘सेवाकार्याने’ अभिवादन; १४ व्या पुण्यस्मरणानिमित्त विविध उपक्रम

​स्मृतीवंदन! स्व.सुभाषराव शहा यांच्या स्मृतींना ‘सेवाकार्याने’ अभिवादन; १४ व्या पुण्यस्मरणानिमित्त विविध उपक्रम

February 18, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..