टीम मंगळवेढा टाईम्स।
रतनचंद शहा सहकारी बँकेचे संस्थापक स्व.रतनचंद शिवलाल शहा यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त आज रविवार दि.४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वा. चोखामेळा चौक येथील
राहुल शहा यांच्या निवासस्थानी प्रतिमेचे पूजन करण्यात येणार आहे.
तरी सर्वांनी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन रतनचंद शहा सहकारी बँकेचे चेअरमन राहुल शहा यांनी केले आहे.
कांद्याची आवक घटल्यानंतरही भाव गडगडलेलेच, भाव अकराशे रुपयांवर स्थिर; निर्यातबंदीमुळे शेतकरी अडचणीत
सोलापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत १८ दिवसांत सव्वाबारा लाख क्विंटल कांदा आला, पण सरासरी भाव अकराशे रुपयांवरच स्थिरावल्याचे चित्र आहे. निर्यातबंदीनंतर भावात झालेली घट दिवसेंदिवस कमीच होत असून आवक वाढल्यानंतर शेतकऱ्यांना सातशे ते आठशे रूपये क्विंटल दराने कांदा विकावा लागत आहे.
केंद्र सरकारने निर्यातबंदी करण्यापूर्वी कांद्याचे दर प्रतिक्विंटल साडेचार हजार रूपयांपर्यंत होते. मात्र, देशाअंतर्गत बाजारपेठांमध्ये कांदा कमी पडेल, भाव वाढतील म्हणून निर्यातबंदीचा निर्णय झाला. मात्र, या निर्णयानंतर शेतकऱ्यांच्या आशा-अपेक्षांचा चुराडा झाला. खर्चही निघेना असा दर कांद्याला मिळत आहे.
१ जानेवारी ते १ फेब्रुवारी या काळात सुट्ट्या वगळून १८ दिवस कांद्याचे लिलाव झाले. त्यात जवळपास १२ लाख ४० हजार क्विंटल कांदा सोलापूर बाजार समितीत विकला गेला. कोट्यवधींची उलाढाल झाली, बाजार समिती मालामाल झाली, पण शेतकऱ्यांना समाधानकारक दर मिळाला नाही.
मागील आठवड्यात तब्बल दीड लाख क्विंटल कांदा एकाच दिवशी बाजारात आला आणि शेतकऱ्यांना सात-आठ रूपये दराने तो विकावा लागला. वास्तविक पाहता कांदा लागवड ते काढून बाजारात आणेपर्यंत प्रतिकिलो किमान १० ते १२ रूपयांपर्यंत खर्च होतो. कांद्याला सुरवातीला चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या
चेहऱ्यावर आनंद होता. सावकाराच्या कर्जाचा डोंगर कमी होईल, मुलाचे शिक्षण, मुलीच्या विवाहाची चिंता मिटेल असे त्याचे स्वप्न होते. पण, केंद्र सरकारच्या एका निर्णयाने त्या स्वप्नांचा क्षणात चुराडा झाला. दुसरीकडे ना दुष्काळ ना अवकाळीची मदत अशी अवस्था आहे.
सोलापूर बाजार समितीत कांद्याची आवक वाढल्याने दर कमी झाला म्हणून जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी कांदा बंगळुरूच्या बाजारात नेला. त्याठिकाणी सोलापूरच्या तुलनेत थोडा जास्त दर मिळाला, पण खर्चही त्या प्रमाणात झाला. त्याठिकाणी देखील शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली.
‘जगावे की मरावे’ अशी चिंताजनक स्थिती बळिराजासमोर असतानाही राज्य सरकारकडून कांदा अनुदानाची घोषणा नाही ना अवकाळी, दुष्काळी भरपाई नाही हे विशेष. गुरूवारी सोलापूर बाजार समितीत ४९३ गाड्या कांद्याची आवक होती. शेतकऱ्यांना सरासरी ११०० रूपयांप्रमाणेच दर मिळाला.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज