टीम मंगळवेढा टाईम्स।
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मंगळवेढा शहर व तालुका आयोजित स्वराज्य सप्ताह शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन करून सुरुवात करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री नामदार अजित दादा पवार व प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे व जिल्हा अध्यक्ष दीपक आबा साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यभरामध्ये दि.12 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी यादरम्यान प्रत्येक तालुक्यामध्ये स्वराज्य सप्ताहाचे आयोजन करण्याचे सूचना देण्यात आल्या आहेत.
त्यानुसार मंगळवेढा शहर व तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन आज सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळांनी स्थापना केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून अभियानास सुरुवात केली.
सदर स्वराज्य सप्ताहामध्ये महिलांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांवरती रांगोळी स्पर्धा, लहान मुलांचे बाल शिवाजी वेशभूषा, शिवाजी महाराजांवरती गाणी लिखाण स्पर्धा, कॉलेजमधील विद्यार्थी विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा ,
युवकांनी एकत्र येऊन शिवाजी महाराजांचे स्मारक परिसर स्वच्छ करणे, मोटरसायकल रॅली काढणे, महिलांचे रॅली काढणे , चौका चौकात महाराजांचे प्रमुख किल्ल्याचे सेल्फी पॉइंट उभारणे छत्रपती शिवाजी महाराजांवरील पोवाडे चौका चौकात ऐकवणे व इतर अनेक कार्यक्रम राबवण्यात येणार आहे.
आज अभियानाचे शुभारंभा प्रसंगी राष्ट्रवादीचे पांडुरंग ताड, अजित जगताप, भारत बेदरे, प्रवीण खवतोडे ज्ञानेश्वर भगरे ,भारत नागणे ,शंकर माळी ,नजीर इनामदार, गणेश पवार सोमनाथ बुरजे ,
विठ्ठल डोके ,बिलाल बागवान, अप्पू पाटील, बसवेश्वर सुडके संभाजी घुले, बशीर बागवान सचिन घुले, राहुल सांवजी ,
विक्रम भगरे ,रशिद तांबोळी ,युवराज बेंद्रे विनायक दत्तू, कुमार होनमाने,निलेश स्वामी ,सुभाष भंडारे, प्रेम ताड, अर्जुन सुरवसे, धुंडाप्पा पाटील ,रेखा साळुंखे ,माधुरी हजारे नाझरकर,आशा मेटकरी ,श्रुती गायकवाड, त्रिशा बांदल,
अमृता नाईकवाडी, सागर खरबडे, राजेंद्र बाबर, अजय अवघडे ,प्रतीक खंदारे ,गणेश भगरे, अनिल पवार, दीपक अवघडे, राजेंद्र लेंडवे, गुंडोपंत लेंडवे, देवा इंगोले उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज