टीम मंगळवेढा टाईम्स ।
महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सिद्धापूर (ता. मंगळवेढा) येथील मातुर्लिंग गणपतीची यात्रा आजपासून सुरू होत आहे. कोरोनानंतर प्रथमच यात्रा भरत असल्यामुळे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश राज्यातून लाखो भक्तांची गर्दी होणार आहे.
त्या पार्श्वभूमीवर मातुर्लिंग गणपती देवस्थान ट्रस्टतर्फे जय्यत : तयारी केल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष भीमगोंडा पाटील यांनी दिली.
यात्रेदिवशी भाविकांनी नवसाची देणगी, सोने-चांदीरूपी वस्तू व रोख स्वरूपात देणगी रक्कम मंदिर समिती ट्रस्टमध्ये नोंद करून रीतसर पावती घ्यावी, असे आवाहन उपाध्यक्ष कल्लाप्पा पाटील व खजिनदार प्रकाश तळ्ळे यांनी केले आहे.
आज १६ जानेवारीला पहाटे ६ वाजता श्री मातुर्लिंग गणपतीची महापूजा आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते व माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
खासदार डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामी, आमदार प्रशांत परिचारक उपस्थित राहणार आहेत. यात्रा काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस चोख बंदोबस्त ठेवणार आहेत.
यात्रेकरूंना मंगळवेढा ते सिद्धापूर मंगळवेढा ते ब्रह्मपुरी माचणूर मार्गे यात्रेदिवशी बसची व्यवस्था केली आहे. ग्रामपंचायतीकडून यात्रेदिवशी भाविकांना ‘श्री’चे दर्शन सुलभ व्हावे म्हणून नदीकाठ ते ‘श्री’च्या स्वयंभू स्थानापर्यंत रॅम्प रस्ता बनविण्यात आला आहे.
पिण्याचे स्वच्छ पाणी, टु- व्हीलर, फोर व्हीलर पार्किंगसह धूळ उडू नये यासाठी पाणी मारण्यात येत आहे, यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी सिद्धापूर ग्रामपंचायत, ग्रामस्थ, देवस्थान ट्रस्ट परिश्रम घेत आहेत.
यात्रेदिवशी संध्याकाळी श्रींच्या पालखीचे गावात आगमन होणार आहे. पालखीसमोर नयनरम्य आतषबाजी होणार आहे. भाविकांच्या मनोरंजनासाठी कन्नड सामाजिक नाटक गर्ती हेणगे गर्वद गड्डुचे आयोजन करण्यात आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज