टीम मंगळवेढा टाईम्स।
भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे व्हा. चेअरमन अनिल दादा सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त आज बुधवार दि.12 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता सलगर ब्रु. येथे भव्य जंगी कुस्त्यांचे मैदान संपन्न होणार आहे.
या कुस्त्यांच्या मैदानात मंगळवेढा तालुक्याचा सुपुत्र आणि नुकताच उपमहाराष्ट्र केसरी झालेला पैलवान महेंद्र गायकवाड याचे विरुद्ध पै.भोला पंजाब यांची शेवटची कुस्ती हे या कुस्ती स्पर्धेचे प्रमुख आकर्षण राहणार आहे. 2,51,000 रु.एवढे बक्षीस या कुस्तीचे असणार आहे.
या कुस्त्यांचे संयोजक अनिलदादा मित्र परिवारातील रामचंद्र उर्फ बंडू जाधव, इंद्रजित पवार, चंद्रकांत देवकर, अशोक निकम, तानाजी चव्हाण यांनी केले आहे.
तसेच उद्या गुरुवार दि.13 एप्रिल रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाचच्या दरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्र रड्डे येथे भव्य सर्व रोग निदान व आरोग्य शिबिर संपन्न होणार आहे. या शिबिरात मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू तरशस्त्रक्रिया होणार आहे.
स्त्रीरोग व प्रसुती शास्त्र विभाग, बालरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सोनोग्राफी व एक्स-रे विभाग, त्वचारोग विभाग आशा सर्व प्रकारच्या रोगांवर अत्यंत तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत मोफत तपासणी व इलाज केले जाणार आहेत.
या सर्व रोग निदान व आरोग्य शिबिराचे आयोजन शिर्के मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड आय.सी.यू. एल.एल.पी. मंगळवेढा यांच्या वतीने करण्यात आले आहे. तर अनिलदादा सावंत मित्र मंडळ रड्डे हे या शिबिराचे संयोजक आहेत.
याशिवाय रविवार दि.23 एप्रिल रोजी भेट सोहळा मैदान हुन्नूर येथे सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत संपूर्ण महाराष्ट्रातील महिला भगिनींचा आवडता तिने अभिनेता क्रांती नाना मळेगावकर प्रस्तुत न्यू होम मिनिस्टर हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
अशाप्रकारे अनिल सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज