टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुक्यातील लवंगी येथील मुक्ताई मतिमंद मुलांचे बालगृह या अनाथ मतिमंद मुलांसाठी कार्यरत संस्थेस श्री कडेपठार चंपाषष्ठी अन्नदान सेवा ट्रस्ट, जुनागड–जेजुरी यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत मोलाची मदत करण्यात आली.

या प्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष धनंजय बारभाई हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी मनोज बारभाई (उपाध्यक्ष), मंदार सातभाई, महेश मोरे, हेमंत चव्हाण, अतिश मोरे, महिंद्र राजगुरू, निलेश बारभाई, संकेत गुरव, मारुती भाऊ हागवणे, संजय करांजवणे आदी मान्यवर उपस्थित होते.

ट्रस्टच्या वतीने बालगृहातील मुलांसाठी कपडे, औषधोपचारासाठी धनादेश तसेच शाळेसाठी आवश्यक अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. या मदतीमुळे अनाथ व मतिमंद मुलांच्या दैनंदिन गरजांना मोठा आधार मिळाला आहे.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस शाळेच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापकांनी संस्थेतील मुलांची दिनचर्या, शिक्षण, संगोपन व उपचारांची माहिती दिली.

प्रमुख पाहुणे धनंजय बारभाई यांनी आपल्या मनोगतात समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी सेवा करणे हीच खरी मानवता असल्याचे भावनिक प्रतिपादन केले.

या कार्यक्रमास शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारीवृंद तसेच गावातील स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी शाळेचे संस्थापक अध्यक्ष व सचिव शिवाजी जाधव सर
(स्वर्गीय मुक्ताई क्रीडा शिक्षण व बहुउद्देशीय संस्था, लवंगी) यांनी उपस्थित मान्यवरांचे मनःपूर्वक आभार मानत, अशा उपक्रमांतून समाजात माणुसकी व सेवाभाव वृद्धिंगत होतो, असे भावनिक आवाहन केले.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज










