mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापूर जिल्ह्यातील ७० हजार हेक्टरवर पिके पाण्यात; ‘या’ तालुक्यात सर्वाधिक फटका

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 2, 2021
in सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील ७० हजार हेक्टरवर पिके पाण्यात; ‘या’ तालुक्यात सर्वाधिक फटका

टीम मंगळवेढा टाईम्स ।

गेल्या आठवडाभरात सोलापूर शहर व जिल्ह्यात पडत असलेल्या पावसाने सरासरी ओलांडली आहे. उच्चांकी पावसाची नोंद झाली आहे.

त्यामुळे ७० हजार ९०३ हेक्टर क्षेत्रावरील शेती पिकाला फटका बसला, तर जवळपास ९७ हजार ६३४ शेतकऱ्याची पिके पाण्यात गेली आहे. पावसामुळे ओढे-नाले, नद्या तुडूंब भरून वाहत आहेत. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

उत्तर सोलापूर, मोहोळ आणि बार्शी तालुक्याला सर्वाधिक फटका बसला आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील ४१ गावातील २३ हजार ४७३ शेतकर्‍यांच्या ६ हजार ७७५ हेक्टर,

मोहोळ तालुक्यातील १० हजार ५८२ शेतकर्‍यांच्या १२ हजार १०३ हेक्टर, बार्शी तालुक्यातील १३७ गावांतील ५५ हजार ९५४ शेतकर्‍यांच्या ४४ हजार ७६३ हेक्टर पिकांना फटका बसला आहे.

तर दक्षिण सोलापूर तालुक्यातील ४७ गावातील ५ हजार ६०१ शेतकर्‍यांच्या ३ हजार ७६१ हेक्टर, अक्कलकोट तालुक्यातील १२ गावांतील ७३० शेतकर्‍यांच्या ५९४ हेक्टर, माढा तालुक्यातील ३७ गावांतील १ हजार २९४ शेतकर्‍यांच्या २ हजार ९०७ हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका बसला आहे.

यामध्ये काही शेतकऱ्याची पिके वाहून गेली आहे. अनेकांच्या फळबागांचेही नुकसान झाले आहे. काही शेतकर्‍यांचे खरीपातील काढणाला आलेले सोयाबिन, उडीद, मुगाचे नुकसान झाले, तर काहीची तूर, भूईमूग, सूर्यफूल पिकाचे नुकसान झाले. त्यामुळे कृषी विभागाच्या पाहणीतून ही आकडेवारी पुढे आली आहे.

३२२ गावांतील ९७ हजार शेतकऱ्यांना फटका

जिल्ह्यातील उत्तर, दक्षिण, अक्कलकेाट, मोहोळ, माढा, बार्शी या सहा तालुक्यातील ३२२ गावांतील ९७ हजार ६३४ शेतकर्‍यांच्या ७० हजार ९०३ हेक्टर शेती पिकाला फटका बसला,

तर यामध्ये करमाळा, पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला, माळशिरस तालुक्यातील नुकसानीची आकडेवारी निरंक दाखविण्यात आली आहे. ही अंदाजे आकडेवारी असून यामध्ये कमी-अधिक वाढ होऊ शकते, असे कृषी विभागाने सांगितले.

जिरायत, बागायतीसह फळपिकांनाही फटका

जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसात अतिवृष्टी झाली असून यामध्ये जिल्ह्यातील ५१ हजार १९० हेक्टर जिरायत क्षेत्रातील पिकांना, तर १६ हजार १७८ हेक्टर बागायत क्षेत्राला, ३ हजार ५३५ हेक्टर फळ पिकांना याचा फटका बसला आहे.

त्यामुळे शेतकर्‍यांना तत्काळ नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी हालहळ्ळी (ता. अक्‍कलकोट) येथील गंगाधर वळदड्डे, गुरुनाथ गोविंदे, गौरीशंकर चौलगे यांच्यासह शेतकर्‍यांनी केली आहे.(स्रोत:पुढारी)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: पिकं

संबंधित बातम्या

पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

डोक्यावरून पाणी गेलं अन् गोरेंनी ‘करेक्ट कार्यक्रम’ केला, अनिल सावंतांच्या नेतृत्वात पंढरपुरात मोठा राजकीय भूकंप; भगीरथ भालकेंना मोठा धक्का

June 11, 2026
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पांडुरंग परिवाराकडून गावोगावी बैठकांचे सत्र सुरू; विधानसभेसाठी मोर्चेबांधणी की…; कार्यकर्त्यांकडून असा आग्रह

दोन पावले मागे, की मोठ्या झेपची तयारी? समर्थक निराश, जाणकार खूश; प्रशांत परिचारकांच्या शांत भूमिकेमागे दडलंय काय?

June 7, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शाळेची भीती संपणार! सोलापूर जिल्ह्यात ‘या’ शाळेतच अंगणवाडी भरणार; बालवयात शाळेची गोडी लागणार; ग्रामीण शिक्षणाला मिळणार नवी दिशा

June 6, 2026
माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते देवेंद्र फडणवीसांचा सत्कार; मालकांनी ठरल्याप्रमाणे केलं… आता संधी मिळणार का? परिचारक समर्थकांचा सवाल

मालक, आता निर्णय घ्या! परिचारक समर्थकांचा भाजपला थेट इशारा, बंडखोरी की पेल्यातील वादळ? पक्षाने शब्द पाळला नाही; प्रशांत परिचारकांकडून मात्र ‘सबुरी’चा सल्ला

June 4, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

मदरशात धार्मिक शिक्षणाच्या नावाखाली अश्लील चाळे; सोलापूरच्या नराधम मौलानाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; पीडितांचा आकडा वाढण्याची भीती

June 2, 2026
बडा मासा! मंगळवेढा प्रांत कार्यालयातील तलाठी निघाला लाचखोर; लाचेची रक्कम घेऊन केला पोबारा; लाच कुणाच्या सांगण्यावरून?

मोठी बातमी! जन्म दाखल्याच्या ऑर्डरसाठी २ हजारांची लाच घेताना महसूल सहाय्यकाला रंगेहाथ पकडले

June 2, 2026
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पांडुरंग परिवाराकडून गावोगावी बैठकांचे सत्र सुरू; विधानसभेसाठी मोर्चेबांधणी की…; कार्यकर्त्यांकडून असा आग्रह

सोलापूर विधानपरिषदेत भाजपचा मोठा डाव; प्रशांत परिचारकांना डावलून राजेंद्र राऊतांना उमेदवारी, परिचारक गट नाराज?

June 1, 2026

तरुणांनो सावधान! बॉडी फुगवण्यासाठी वापरले जाणारे घातक इंजेक्शन विकणारे रॅकेट जेरबंद; २ लाखांचा मुद्देमाल जप्त; सोलापूर जिल्ह्यात अवैध नशिल्या इंजेक्शनचा काळा बाजार उघड

June 1, 2026
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पांडुरंग परिवाराकडून गावोगावी बैठकांचे सत्र सुरू; विधानसभेसाठी मोर्चेबांधणी की…; कार्यकर्त्यांकडून असा आग्रह

ब्रेकिंग न्यूज! सोलापूर विधान परिषदेसाठी प्रशांत परिचारक फायनल? अधिकृत घोषणा बाकी; मात्र भाजपच्या ‘त्या’ नेत्याच्या एन्ट्रीने सस्पेन्स वाढला

May 30, 2026
Next Post
मंगळवेढ्यातील ‘त्या’ बोगस दाखल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ; ग्रामसेवकाला बजावली कारणे दाखवा नोटीस

सोलापुरातील शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात हयगय; कंपनीला कारणे दाखवा नोटीस

ताज्या बातम्या

पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

डोक्यावरून पाणी गेलं अन् गोरेंनी ‘करेक्ट कार्यक्रम’ केला, अनिल सावंतांच्या नेतृत्वात पंढरपुरात मोठा राजकीय भूकंप; भगीरथ भालकेंना मोठा धक्का

June 11, 2026
मंगळवेढ्यात बेलदार हॉस्पिटलने वाचवले ‘या’ तरुणाचे प्राण; नातेवाईक नसतानाही डॉक्टरांनी दाखवली ‘देवमाणूसकी’

मंगळवेढ्यात बेलदार हॉस्पिटलने वाचवले ‘या’ तरुणाचे प्राण; नातेवाईक नसतानाही डॉक्टरांनी दाखवली ‘देवमाणूसकी’

June 10, 2026
चमकदार कामगिरी! सोलापूर पोलिसांनी उध्वस्त केला बनावट नोटांची छपाई करणारा अड्डा

मंगळवेढ्यात थरार! पोलिसांना गुंगारा देऊन सब जेलमधून पळाला; पण पोलिसांच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने कर्नाटक गाठून ठोकल्या बेड्या

June 11, 2026
बळ वाढले! आ.समाधान आवताडे व बबनराव आवताडे यांचे मनोमिलन; कारखान्याच्या हितासाठी पाठिंबा केला जाहीर

दोन बैठका, एकच उमेदवार! मंगळवेढ्यात आवताडेंच्या ‘मायक्रो-प्लॅनिंग’ची चर्चा; काका-पुतण्याच्या लागोपाठ स्वतंत्र बैठका; राजकीय वर्तुळात खळबळ

June 10, 2026
​मंगळवेढा-बोराळे रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात घोषणाबाजी; ‘इतक्या’ दिवसांत काम सुरू न झाल्यास उग्र आंदोलनाचा इशारा; दगडांची माळ गळ्यात घालत शिवसेना आक्रमक

​मंगळवेढा-बोराळे रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात घोषणाबाजी; ‘इतक्या’ दिवसांत काम सुरू न झाल्यास उग्र आंदोलनाचा इशारा; दगडांची माळ गळ्यात घालत शिवसेना आक्रमक

June 11, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

पालकांनो लक्ष द्या! राज्यातील शाळा ‘या’ तारखेपासून सुरू होणार; मात्र विदर्भासाठी नवी तारीख, वाचा..

June 11, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा