टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुक्यातील एका गावातील सरपंच अलका महादेव देवकर यांच्यावरील अविश्वास ठराव एक विरुद्ध सात मतांनी मंजूर करण्यात आला.
दरम्यान, इतर सदस्यांना विश्वासात न घेता कर्नाटकात सामील होणार असल्याचा ग्रामपंचायतीचा ठराव करणे सरपंचांच्या अंगलट आल्याची चर्चा होत आहे.
लवंगी येथे ग्रामपंचायत कार्यालयात तहसीलदार स्वप्निल रावडे यांच्या अध्यक्षतेखाली अविश्वास ठरावावर मतदान घेण्यासाठी विशेष सभा घेण्यात आली. या सभेत एकविरुद्ध सात मतांनी
अविश्वास ठराव मंजूर केला. महिला सदस्य जयश्री गणपत मासाळ ह्या गैरहजर राहिल्या.
सन २०२१ रोजी लवंगी ग्रामपंचायत निवडणूक झाली होती. सरपंच अलका महादेव देवकर या सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करणे, शासनाच्या विविध योजना राबविण्यास विरोध करणे,
ग्रामपंचायतीचा खर्च मनमानी पद्धतीने करणे, ग्रामपंचायतीने बहुमताने केलेल्या ठरावाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करणे यासह मनमानीपणे ठराव करणे या कारणांमुळे इतर सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता.
त्यावर मतदान घेण्यात आले. कृष्णा माने, मायाप्पा पांढरे, तानाजी खडतरे, शाहीर शेख, मनीषा खडतरे, रेश्मा पाटील, पूनम सवाईसर्जे या सात सदस्यांनी विरोधी मतदान केले. यामुळे सरपंच अलका महादेव देवकर यांना सरपंच पदावरून पायउतार व्हावे लागले.
लवंगी ग्रामपंचायतमध्ये एकविरुद्ध सात मतांनी अविश्वास ठराव मंजूर झाला आहे. त्यामुळे येथील सरपंच पद रिक्त झाले आहे. नवीन सरपंच निवडीसाठी प्रक्रिया राबविली जाईल. – स्वप्निल रावडे कर्नाटकात सहभागी होण्याबाबत तहसीलदार, मंगळवेढा
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज