मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणी दोषींना ३ मार्चला फासावर लटकवलं जाणार आहे. चारही नराधमांना ३ मार्चला सकाळी ६ वाजता फाशी दिली जाणार आहे.
कोर्टाने नवं डेथ वॉरंट जारी केलं आहे. त्यानुसार या चारही दोषींची फाशीची तारीख ३ मार्च ही ठरली आहे. दोषींकडे अद्यापही कायदेशीर पर्याय उपलब्ध असल्याचं आरोपींच्या वकिलांनी म्हटलं आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज