टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी येथे महिला मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी आरोग्य शिबीर घेतले व 250 रुग्णांवर मोफत उपचार केले आहेत.
आरोग्य शिबिरामध्ये फिजिशियन डॉ.विलास तोंडे-पाटील, महेश सर गायनॅक डॉ.स्मिता मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत शिबिर ठेवले होते.आरोग्य शिबिरामध्ये फिजिशियन डॉ.विलास तोंडे-पाटील, डॉक्टर महेश कोनळी आणि स्त्री रोग प्रसूतीतज्ञ डॉ.स्मिता पाटील यांच्या कडून महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत तपासणी व मोफत उपचार शिबिर ठेवले होते.
250 रुग्णांवर मोफत उपचार केले असून महिला मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे वेळोवेळी गावोगावी जाऊन रुग्णांना जास्तीत जास्त लाभ देण्यासाठी प्रयत्नशील असते.
शिबिरामध्ये हृदयविकार, उच्च रक्तदाब मधुमेह, छातीत दुखणे, किडनी व मूत्रमार्गाचे आजार हाडांचे आजार तसेच यकृत पोटाचे विकार श्वसनाचे विकार स्त्रियांचे गंभीर आजार, बालकांचे आजार तसेच इतर आजारा बाबत तपासणी करून मोफत उपचार म्हणून औषधे देण्यात आली.
शिबिरामध्ये मिस्टर सरपंच वंदना आप्पा शिंदे, उपकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.महेश माळी सर्व निंबोणी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सध्या आयुष्यमान भारत योजना पंधरवाडा चालू असून या योजनांच्या प्रचारार्थ कविता अशी शिबिरे घेतली जात आहेत.
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत यामधून 971 आजारांवर होण्याबद्दल रुग्णांना यावेळी माहिती देण्यात आली.
तसेच हृदयविकारावर अँजिओग्राफी आणि एन्जोप्लास्टी महिला हॉस्पिटलमध्ये सुविधा उपलब्ध असल्याची माहिती नागरिकांना दिली. महिला हॉस्पिटल अँड मल्टी स्पेशलिटी मध्ये सध्या किडनी विकार असणाऱ्यांसाठी डायलेसिस वर मोफत उपचार केले जात आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज