mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापूर ग्रामीणमध्ये आणखी 288 नव्या कोरोनाबाधितांची भर तर तिघांचा बळी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
सोलापूर ग्रामीणमध्ये आणखी 288 नव्या कोरोनाबाधितांची भर तर तिघांचा बळी

टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यातील ग्रामीण भागात आज नव्याने 288 कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले असून त्यामुळे बाधितांची एकूण संख्या 7 हजार 60 इतकी झाली आहे. त्याचबरोबर आज तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृतांची संख्या 197 एवढी झाली आहे. ( Solapur rural corona news update )


आज एकूण 2 हजार 628 जणांची तपासमी करण्यात आली. त्यापैकी 2 हजार 340 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 288 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

‘या’ भागात आढळले नवे रुग्ण


मंगळवेढ्यातील कुंभारगल्ली, माळीगल्ली, नवीन गल्ली, पाटखळ, शिरनांदगी, तामर्डी, उचेठाण,सांगोल्यातील चिकमहूद, घेरडी, जवळा, खवसपूर, लोनविरे, मेथवडे, नाझरे, सरगरवाडी, दक्षिण सोलापुरातील बोरामणी, दर्गनहळ्ळी, टाकळी, विंचूर,मोहोळमधील आण्णाभाऊ साठे नगर, डिकसळ, कामती बु तांडा, खवणी, क्रांतीनगर, कुरुल, पाटकूल, सोहाळे, उत्तर सोलापुरातील मार्डी येथे रुग्ण सापडले आहेत.


बार्शीतील आडवा रस्ता, अलिपूर रोड, आझाद चौक, भीमनगर, भिसे प्लॉट, चिंचोळी, फुले प्लॉट, गादेगाव रोड, घारी, हांडे प्लॉट, जैनमंदिर, जावळे प्लॉट, कसबा पेठ, खामगाव, लहुजी चौक, लक्ष्मीनगर, पांगरी, रामभाऊ पवार चौक, राऊत गल्ली, सनगर गल्ली, शेळगाव, सोलापूर रोड, तुळजापूर रोड, उपळाई रोड, वैराग, माळशिरस तालुक्‍यातील अकलूज, पोलिस स्टेशन मागे माळशिरस, बोरगाव, कण्हेर, माळीनगर, निमगाव, श्रीपूर, वेळापूर, यशवंतनगर, शिंघोरणे तर.


पंढरपूर तालुक्‍यातील आढीव, आंबेडकरनगर, अनिल नगर, बादलकोट, फरतळे दिंडीजवळ, गजानन महाराज मठाजवळ, नागपूरकर मठाजवळ, भजनदास चौक, भक्ती मार्ग, भोसे, भुवनेश्‍वरी मठ, डाळे गल्ली, डोंबे गल्ली, गादेगाव, गाताडे प्लॉट, गोपाळपूर, गुरसाळे, हरिदास वेस, इसबावी, जुनी पेठ, कडबेगल्ली, करकंब, करोळे, कासेगाव, कौठाळी, कवठेकर गल्ली, खर्डी, कोळेगल्ली, कुंभार गल्ली, लकेरी गल्ली, लक्ष्मी टाकळी, महापौर चाळ, महावीरनगर, मटन मार्केट, मेंढापूर, मुंढेवाडी, नवीन बागवान मुहल्ला, पंचमुखी मारुती, पुंडलिक नगर, रांझणी, रोपळे, संभाजी चौक, सांगोला रोड, संतपेठ, सरकोली, सावता माळीमठ, शासकीय वसाहत, शिवाजी चौक, सुलेमान चाळ, तुंगत, उमदे गल्ली, उंबरेपागे, वाखरी, विस्थापितनगर, विठ्ठल नगर,


अक्कलकोट येथील कडबगाव रेल्वे स्टेशन, कर्जाळ, कुरनूर, वागदरी, करमाळ्यातील फंड गल्ली, गुजर गल्ली, किल्ला वेस, मारवाड गल्ली, सिद्धार्थनगर, माढ्यातील लऊळ, मानेगाव या गावांमध्ये आज नव्याने कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

अद्यापही रुग्णालयात दोन हजार 769 जणांवर उपचार सुरु आहेत. चार हजार 94 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. 138 जणांचे अहवाल येणे अद्यापही बाकी आहे.

‘या’ भागात कोरोनाचे तीन बळी

पंढरपूर तालुक्यातील आढीव येथील 65 वर्षीय महिला, अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथील 73 वर्षीय पुरुष तर बार्शी चिखर्डे येथील 72 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

राज्यातील व देशातील


ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 95 6161 7373 हा आमचा नंबर.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Latest NewsSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
धक्कादायक : मुलाला कोरोना झाल्याच्या भीतीपोटी वृद्ध पित्याची आत्महत्या

धक्कादायक : मुलाला कोरोना झाल्याच्या भीतीपोटी वृद्ध पित्याची आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धनश्री अर्थकारणाच्या यशस्वी परंपरेचा तीन दिवस दिमाखदार सोहळा; शरद पवार व सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थीत संपन्न होणार प्रा.शिवाजीराव काळुंगे सर यांचा अमृतमहोत्सव

दुष्काळाचा बिमोड करण्यासाठी शेतकऱ्यांची वज्रमुठ; मंगळवेढ्यात गाजणार ३४ वी ‘पाणी संघर्ष परिषद; २६ जूनला दुष्काळग्रस्तांचा हुंकार

June 23, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मोठी बातमी! मंगळवेढा तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला; प्रारूप आरक्षण जाहीर होताच इच्छुकांची उडाली धावपळ; हरकती नोंदवण्यासाठी अवघे ‘इतके’ दिवस शिल्लक

June 23, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

भयंकर निष्काळजीपणा! डॉक्टरांच्या अनुपस्थितीत नर्सने केली प्रसूती; निष्पाप माता-बाळाचा बळी, चितेच्या राखेत पुरावा

June 22, 2026
बळीराजाला मोठा दिलासा! शेतकरी कर्जमाफीची घोषणा; देवेंद्र फडणवीसांची घोषणा; कोणाचे कर्ज होणार माफ?

शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी घोषणा! राजकारण की समाजकारण? मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना थेट आव्हान; नेमका प्लॅन काय?

June 22, 2026
महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

सावधान! मंगळवेढा बस स्टँडवर चोरटे सक्रिय; वृद्धेचे दागिने आणि रोकड लंपास, गुन्हा दाखल; प्रवाशांची सुरक्षा धोक्यात

June 22, 2026
​मंगळवेढ्यातील महिलांनो सावधान! मॉर्निंग वॉक दरम्यान शिक्षिकेसोबत घडला धक्कादायक प्रकार

​मंगळवेढ्यातील महिलांनो सावधान! मॉर्निंग वॉक दरम्यान शिक्षिकेसोबत घडला धक्कादायक प्रकार

June 21, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा