मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । डाळिंब पीक विमा वितरणात मंगळवेढा तालुक्यातील भोसे,मरवडे,मंगळवेढा ही तीन मंडले वगळली आहेत.हजारो शेतकऱ्यांना डाळिंबाच्या पीक विम्यापासून वंचित ठेवण्यात आल्यामुळे तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.यावर तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी कृषी विभाग व पीक विमा कंपन्यांचे अधिकारी यांची बैठक घेतली.
या बैठकीत वगळण्यात आलेल्या मंडलांचा नव्याने प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला.
मंगळवेढा तालुक्यात अतिवृष्टी तसेच हवामानातील बदलामुळे डाळिंब पिकाचे यावर्षी फार मोठे नुकसान झाले.अशा परिस्थितीत डाळिंब पीकविमा वितरणात मंगळवेढा तालुक्यातील जवळपास तीन हजार शेतकऱ्यांना वगळण्यात आले.यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला गेला.याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तहसीलदार स्वप्नील रावडे यांना निवेदन देण्यात आले.तसेच प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
शेतकऱ्यांना लवकरात लवकर न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता.याची दखल घेत तहसीलदार रावडे यांनी कृषी विभाग व पीक विमा कंपन्यांचे अधिकारी यांच्यासमवेत बैठक घेतली.या बैठकीत कृषी व महसूल विभागाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना नवीन प्रस्ताव दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी कृषी,महसूल विभाग,विमा कंपनीचे अधिकारी,प्रा.संतोष पवार,अँड.राहूल घुले, राजकुमार स्वामी,श्रीमंत केदार,आबा खांडेकर, सचिन गरंडे,शंकर संगशेट्टी, हनुमंत गवंड, अमोगसिध्द काकणकी,आप्पाराया काकणकी महेश तळ्ळे, शिवकुमार पाटील,मलकारसिध्द रवी , गुरनिंगप्पा रवी, मलकाण्णा रवी,रामचंद्र रवी, कल्लाप्पा रवी,आप्पासाहेब रवी,रेवणसिध्द रवी, धोंडाप्पा रवी, भोसे तून संतोष खडतरे, आनंद खडतरे,संभाजी बंडगर, तुकाराम मलबदी,रामनिंग मेडीदार, रेवणसिध्द मलावदी, भीमा तांबे,हनुमंत चौगुले, विठ्ठल हत्ताळी,महादेव जमखंडी, सोमण्णा जमखंडी, शिररनांदगी चे कृष्णदेव थोरबोले, अशोक थोरबोले, विठ्ठल मेटकरी,लक्ष्मण मेटकरी, खवे तून संग्राम दुधाळ,शेखर साळुंखे,आगतराव दुधाळ, पंपू पवार,विष्णू कोळगे,निंबोणीतून सुनील ढगे,मनू येडवे,अंकुश ढगे आदी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
जगभरातील लाखो वाचक असलेले सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.mangalwedhatimes.in
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज