टीम मंगळवेढा टाईम्स । करोना प्रसाराच्या धोक्यामुळे गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून यूपीएससी प्रिलिम्स (पूर्व परीक्षा) आणि मेन (मुख्य) परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. गेल्या काही दिवसांपासून या परीक्षेची तारीख करण्यात येणार असल्याची चर्चा सुरू होती. अखेर आयोगानं परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षा आणि मुलाखतीच्या तारखा ठरवण्यासंदर्भात आज बैठक झाली. या बैठकीत पूर्व आणि मुख्य परीक्षेची तारीख निश्चित करण्यात आली.
– सोलापूरकरांनो सावधान ! ‘आयसीयु’ फुल्ल सिव्हिल हॉस्पिटलची क्षमता संपली
-केंद्र सरकारने जनधन खात्यामध्ये पैसे जमा केले ; रक्कम काढण्यासाठी हे आहेत नियम
-दिलासादायक : सोलापुरमध्ये पहिल्यांदाच आजचे सर्व रिपोर्ट आले निगेटिव्ह
करोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं लॉकडाउनची घोषणा केली. त्यानंतर सर्वच काम ठप्प झाली. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षांवरही यांचा परिणाम झाला. केंद्रीय लोकसेवा आयोगानं जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार ३१ मे २०१९ रोजी पूर्व परीक्षा घेण्यात येणार होती. मात्र, लॉकडाउनमुळे ती पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर २ जून रोजी ही परीक्षा होणार असल्याचं आयोगानं जाहीर केलं होतं. पण, परिस्थितीत सुधारणा न झाल्यानं आयोगानं अनिश्चित काळासाठी परीक्षा पुढे ढकलली.
या संदर्भात शुक्रवारी (५ जून) आयोगाची बैठक पार पडली. त्यात तारीख निश्चित करण्यात आली. केंद्रीय लोकसेवा आयोगानं आपल्या संकेतस्थळावर शुक्रवारी पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या तारखांची घोषणा केली. ४ ऑक्टोबर रोजी पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. तर मुख्य परीक्षा ८ जानेवारी २०२१ रोजी घेण्यात येणार आहे.
New date of UPSC exam announced; The main exam will be held next year
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज