टीम मंगळवेढा टाईम्स ।
वर्षाला निरोप देण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना एक धक्कादायक बातमी समोर येते आहेत. भारतात कोरोनाच्या नव्या प्रकाराचे 6 रुग्ण आढळून आले आहेत.
ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची लक्षणं या रुग्णांमध्ये सापडली आहेत. एकूण 6 जणांच्या सॅम्पलपैकी 3 बेंगळुरूतील NIMHANS मध्ये, 2 हैदराबादमधील CCMB मध्ये तर एक पुण्यातील NIV मध्ये पॉझिटिव्ह आढळले आहेत.
महाराष्ट्रातील 4 जिल्ह्यांमध्ये रुग्ण
इंग्लंड आणि ब्रिटनहून आलेल्या प्रवाशांपैकी नागपूर, औरंगाबाद आणि कल्याणमधील प्रत्येकी एक जण कोरोना पॉझिटिव्ह सापडला आहे.
या तिघांचे नमुने पुण्यातील NIV लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. सध्या या तिघांवरही उपचार सुरू आहेत. पुण्याच्या लॅबमधून येणाऱ्या रिपोर्टकडे संपूर्ण भारताचं लक्ष लागलं आहे.
करोनाच्या संसर्गाचा वेग कमी होत असतानाच ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या नव्या करोनानं डोकेदुखी वाढवली आहे. वेगानं पसरणाऱ्या करोनाच्या या नवीन प्रकारानेही जगभरात हातपाय पसरण्यास सुरूवात केली आहे.
आतापर्यंत १६ देशात पोहोचलेल्या करोनाच्या नव्या प्रकाराने आता भारतातही शिरकाव केला आहे. देशात करोनाच्या नव्या प्रकाराचा संसर्ग झालेले सहा रुग्ण आढळून आले आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज