टीम मंगळवेढा टाईम्स ।
राज्यात मागील काही दिवसांपासून वादग्रस्त व्यक्तव्यावरून सुसंस्कृत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात घमासान सुरू असतानाच वाचळविरांमध्ये आता योग विद्यागुरू म्हणवून घेणारे रामदेव बाबा यांची भर पडली आहे.
महिलांबाबत वादग्रस्त विधान करताना रामदेव बाबांना आपण आदीमानव काळात असल्याचा भास झाला की काय? त्यामुळेच त्यांची जीभ घसरली.
खरं त्यांच्या नावात “राम’ही आहे आणि “देव’ही आहे पण ते नुसतेच “बाबा’ निघाले.
त्यांनी त्यांच्या नावातील हे दोन शब्द काढून टाकावेत. तुझ्या जीभेला हाड आहे की नाही, असे सहज म्हटले जाते
पण ज्या ठिकाणी आया-बहिणींच्या आब्रुविषयीच बेताल वक्तव्य केल जात असतील तर अशांचा जीभाही काय कामाच्या,अशी खंत बहुजन रयत परिषदेच्या महिला प्रदेशाध्यक्ष ॲड. कोमल साळुंखे-ढोबळे यांनी व्यक्त केली.
ठाण्यातील हायलॅंड भागात पतंजलि योगपीठ आणि मुंबई महिला पतंजलि योग समितीच्या वतीने आज योग विज्ञान शिबीर आणि महिला संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमावेळी रामदेव बाबा महिलांशी संवाद साधत होते. त्यावेळी महिला साडी नेसल्यावर, सलवार कुर्त्यावरही चांगल्या दिसतात आणि काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात, असे वादग्रस्त वक्तव्य बाबा रामदेव यांनी केले.
रामदेव बाबांच्या या वक्तव्याने नवा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बहुजर रयत परिषदतर्फे बाबाच्या या वक्तव्याचा तिव्र निषेध करण्यात आला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज