मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनी काल पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर भाषणात तोंड भरुन स्तुती केली आहे.
काही दिवसांपूर्वी उत्तम जानकर हे एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी थेट पंढरपूरला येऊन प्रत्येक कार्यक्रमात हजेरी लावत होते.
काल होलार समाजाच्या मेळाव्यात शिंदे सेनेचे दोन मंत्री स्टेजवर असताना चक्क त्यांच्यासमोरच जानकर यांनी शिंदेंवर स्तुती सुमने उधळण्यास सुरुवात केल्याने पुन्हा नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.
जानकर यांची आमदारकी सध्या त्यांच्या जात प्रमाणपत्रामुळे अडचणीत आली असताना वारंवार त्यांना आलेले शिंदे प्रेमाचे भरती चर्चेचा विषय ठरु लागली आहे.
मी 40 वर्षाच्या राजकारणात खूप माणसं पाहिली पण एकनाथ शिंदे…
मी 40 वर्षाच्या राजकारणात खूप माणसं पाहिली. पण एकनाथ शिंदे यांच्यासारखा माणूस वेगळा आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणजे कर्णासारखे दानशूर माणूस आहे, अशा शब्दात आमदार जानकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्तुती केली.
यावेळी शिवसेना शिंदे गटाचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट व फलोत्पादन मंत्री भरत शेठ गोगावले स्टेजवर उपस्थित होते. याच स्टेजवर त्यांचे कट्टर विरोधक असणारे भाजपचे माजी आमदार राम सातपुते असताना त्यांच्यासमोरच एकनाथ शिंदे यांची केलेली स्तुती वेगळा संदेश देत होती .
कट्टर विरोधक होलार समाजाच्या कार्यक्रमानिमित्ताने व्यासपीठावर एकत्र
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यामध्ये सतत राजकीय वातावरण गरम असते. मोहिते पाटील आणि माजी आमदार राम सातपुते यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या काळात ऐकमेकांवर टीका केल्याची पाहायला मिळालं होतं. त्यानंतर काल माळशिरस तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील तसेच माजी आमदार राम सातपुते हे एकाच व्यासपीठावर आल्याचं पाहायला मिळालं.
होलार समाजाच्या कार्यक्रमानिमित्ताने ते एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एकमेकांच्या विरोधात अनेक भाष्य करुन राजकीय वातावरण गरम झाले होते. त्याचबरोबर आगामी काळात राज्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका या निवडणुका होत आहेत.
त्या निवडणुकांमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही प्रकारचे राजकारण न आणता या निवडणुका पार पाडण्याचे आदेश सर्व आमदार खासदार आणि पक्षातील कार्यकर्त्यांना दिले आहेत. त्यामुळेच या ठिकाणी कार्यक्रमाला हे तिन्ही आमदार एकत्र पाहायला मिळाल्याची चर्चा सुरु आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज