mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज पंढरपूरात; कार्यकर्ते झाले सक्रिय,असा असणार दौरा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज पंढरपूरात; कार्यकर्ते झाले सक्रिय,असा असणार दौरा

 

टीम मंगळवेढा टाईम्स । राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष,माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आज पंढरपूर दौऱ्यावर येणार आहेत. सोलापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते, माजी आमदार सुधाकरपंत परिचारक, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष राजूबापू पाटील आणि रामदास महाराज कैकाडी (जाधव) यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने श्री.पवार हे या तिन्ही सहकाऱ्यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेणार आहेत,अशी माहिती येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सूत्रांकडून समजली.

माजी आमदार व सोलापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते सुधाकरपंत परिचारक यांनी अनेक वर्षे श्री.पवार यांच्या नेतृत्वाखाली काम केले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थापनेनंतर अनेक वर्षे श्री. पवार यांचे आणि श्री.परिचारक यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. श्री.पवार यांचे जिल्ह्यातील विश्वासू सहकारी म्हणून श्री. परिचारक यांची ओळख होती. 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत श्री. परिचारक यांनी भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढवली.

परंतु तरीही अनेक वर्षे मिळून काम केलेले असल्याने दोन्ही नेत्यांमधील जिव्हाळ्याचे संबंध कायम होते.

परिचारकांच्या निधनापूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष राजूबापू पाटील यांचे आणि त्यानंतर नुकतेच रामदास महाराज कैकाडी यांचेही निधन झाले.

राजूबापू पाटील यांचे वडील (कै.) यशवंतभाऊ पाटील यांच्यापासून श्री. पवार यांचे पाटील घराण्याशी संबंध होते. राजूबापू पाटील हेदेखील श्री. पवार यांचे कट्टर समर्थक होते.


रामदास महाराज कैकाडी यांचाही श्री. पवार यांच्याशी चांगला स्नेह होता. पंढरपूरमधील परिचारक, पाटील आणि कैकाडी (जाधव) यांच्यासारखे निकटचे सहकारी गमावल्याने त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी श्री. पवार हे आज मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास खास पंढरपूर दौऱ्यावर येणार आहेत.

आज मंगळवारी दुपारी बारा वाजता पुण्याहून श्री. पवार हे मोटारीने पंढरपूर तालुक्‍यातील भोसे येथे येणार आहेत. कै.राजूबापू पाटील यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन नंतर ते दुपारी एक ते दीड या वेळात पंढरपूर येथे कै. सुधाकरपंत परिचारक यांच्या वाड्यात त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. त्यानंतर ते कैकाडी महाराज मठामध्ये कै.रामदास महाराज जाधव यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करणार आहेत.

दुपारी दोन वाजता श्री. पवार यांचे जिल्हा न्यायालयालगत आमदार भारत भालके यांच्या निवासस्थानी आगमन होईल. दुपारी पावणेतीननंतर श्री. पवार हे मोटारीने बारामतीकडे रवाना होणार आहेत.

सोलापूरसाठी सुरु आहे आग्रह

पुणे पदवीधर मतदारसंघात यावेळेस सोलापूर जिल्ह्याला स्थान मिळावे यासाठी शहराध्यक्ष भारत जाधव , कार्याध्यक्ष संतोष पाटील हे पवार यांची भेट घेणार असल्याचे सांगितले. प्रवक्ते उमेश पाटील यांना उमेदवारी देण्याचा आग्रह या भेटीत होणार आहे असे पवार यांनी सांगितले.

दहा ऑक्टोबरला सोलापूर दौरा

महाविकास आघाडीतील ऐक्य कायम टिकावे या दृष्टिकोनातून १० ऑक्टोबर रोजी एका शिवसेनेच्या नेत्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी खासदार शरद पवार सोलापूर दौयावर येत असल्याचे सांगण्यात आले. या दौऱ्यात जिल्हा परिषद, बाजार समितीच्या अनुषंगाने निर्माण झालेल्या स्थितीवर चर्चा होणार आहे.

NCP president Sharad Pawar in Pandharpur today;  The activists became active, the tour will be like this

राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Solapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
शेतकरी म्हणतात दुधाचे वेळेवर पैसे, पशुखाद्य द्या; दूध उत्पादकांशी अध्यक्ष दिलीप माने यांचा संवाद

शेतकरी म्हणतात दुधाचे वेळेवर पैसे, पशुखाद्य द्या; दूध उत्पादकांशी अध्यक्ष दिलीप माने यांचा संवाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

मोठी बातमी! सोलापूर ZP चा अध्यक्ष ‘या’ तारखेला ठरणार; तर 11 पंचायत समितीचे कारभारी 12 मार्चला निवडणार…

March 5, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! राज्यातील सर्व पाणंद रस्त्यांबाबत सरकारचा मोठा निर्णय

March 5, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

खुशखबर! लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट; अर्थसंकल्पात मुख्यमंत्री करणार मोठी घोषणा

March 5, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! मोबाइल वापरण्यास दिला नाही म्हणून १३ वर्षांच्या मुलाची आत्महत्या; सोलापूर जिल्हा हादरला

March 4, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

नियतीचा क्रूर खेळ! पोलीस भरतीची तयारी अन् जिद्दीचा शेवट, भीमा नदीत बुडून अजय काळाच्या पडद्याआड; ब्रह्मपुरीवर शोककळा

March 4, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

मोठी बातमी! मंगळवेढा पंचायत समिती सभापती व उपसभापती निवड १२ मार्चला; ‘या’ नावावर होणार शिक्कामोर्तब?

March 3, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा